कोल्हापूरच्या नवप्रविष्ट पोलिसाचा मृत्यू

By Admin | Published: June 20, 2014 12:48 AM2014-06-20T00:48:08+5:302014-06-20T00:48:08+5:30

कोल्हापूरच्या नवप्रविष्ट पोलीस शिपायाचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला.

Death of Kolhapur's newly-entered Police | कोल्हापूरच्या नवप्रविष्ट पोलिसाचा मृत्यू

कोल्हापूरच्या नवप्रविष्ट पोलिसाचा मृत्यू

googlenewsNext


सोलापूर : केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या कोल्हापूरच्या नवप्रविष्ट पोलीस शिपायाचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला.
संदीप शिवाजी जगताप (वय २५,उजळाईवाडी, जि. कोल्हापूर) असे त्या पोलिसाचे नाव आहे. तो बुधवारी रात्री ९ वा. नित्यक्रम आटोपून खोली नं. ११५ मधील आपल्या कॉटवर जाऊन झोपला. झोपताना त्याने मोबाईलवर पहाटे ५.१0 वा. गजर लावला होता. पहाटे मोबाईल वाजू लागल्यावर तो उठला नाही. बाजूचे सहकारी उठले व त्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. पण तो हालचाल करीत नसल्याचे आढळले. सहकाऱ्यांनी ही माहिती तेथील अधिकाऱ्यांना दिली. प्रशिक्षक सहायक पोलीस निरीक्षक राजू शिंदे यांनी त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्राथमिक अहवालानुसार हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला असावा असे डॉक्टरांनी म्हटले आहे. या घटनेचे माहिती मिळताच प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी प्राचार्य पाटील व इतर अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

Web Title: Death of Kolhapur's newly-entered Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.