विजयकुमार देशमुखांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र; सोलापुरातील भाजप आक्रमक

By Appasaheb.patil | Published: October 9, 2022 06:03 PM2022-10-09T18:03:55+5:302022-10-09T18:04:03+5:30

पोलीस आयुक्तांकडे तक्रार : गुन्हा दाखल करण्याची मागणी

Death threat letter to Vijayakumar Deshmukh; BJP aggressive in Solapur | विजयकुमार देशमुखांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र; सोलापुरातील भाजप आक्रमक

विजयकुमार देशमुखांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र; सोलापुरातील भाजप आक्रमक

googlenewsNext

सोलापूर : माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पत्र पाठवल्या प्रकरणी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.  आमदार विजयकुमार देशमुख यांना ४ ऑक्टोबर २०२२ रोजी पत्र आले होते. पत्र पाहिले असता त्यात, मी पीएफआय संघटनेचा कार्यकर्ता आहे, असे म्हणत गलिच्छ भाषेत लिखाण करण्यात आले होते. दरम्यान, संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रविवारी सोलापूर शहर भाजपाच्यावतीने मार्केट यार्डसमोर आंदोलन करण्यात आले.

एक तासभर चाललेले या रास्ता रोको आंदोलनामुळे हैदराबाद रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पहावयास मिळाली. या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, युवा मोर्चा शहराध्यक्ष गणेश साखरे, नरेंद्र काळे, संजय कोळी, किसान मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष शंकर वाघमारे, लक्ष्मण केकाण, ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नु, शिवानंद पाटील,अमर पुदाले अनंत जाधव, ज्ञानेश्वर कारभारी, प्रा नारायण बनसोडे, राजकुमार पाटील, प्रशांत फत्तेपुरकर, भैय्या बनसोडे, अजित गायकवाड, शोभा बनशेट्टी, वंदना गायकवाड, अनुजा कुलकर्णी, विजया वड्डेपल्ली, बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे विरेश उंबरजे प्रवीण दर्गोपाटील, किसन सरवदे लक्ष्मण गायकवाड शालन शिंदे कल्पना कारभारी रामेश्वरी बिरू, राधिका पोसा, प्रेम भोगडे, शंकर बंडगर, ज्ञानेश्वर कारभारी, धोंडप्पा वग्गे, धरीराज रमणशेट्टी, यांच्यासह भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दरम्यान, धमकीचे पत्र आल्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी दि. ५ ऑक़्टोबर रोजीचा विजयादशमी सण होऊ दिला. दि.६ ऑक्टोबर रोजी आमदारांचे स्वीय सहायक उमेश कोळेकर यांनी पोलीस आयुक्तांना पत्र दिले. याबाबत तातडीने आपल्यास्तरावरून सखोल चौकशी करावी व संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. पोलीस आयुक्तांनी पत्राची दखल घेऊन त्याचा तपास करण्याचे आदेश एटीएस व गुन्हे शाखेला दिले आहेत. पत्र नेमके कोणी पाठवले? याचा तपास केला जात आहे. 

------------

आमदार विजयकुमार देशमुख यांना धमकीचे पत्र आले आहे, याबाबत तपास करण्याचे आदेश मला पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. आमचा तपास सुरू आहे, लवकरच याचा छडा लावला जाईल.

- सुनील दोरगे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा.

Web Title: Death threat letter to Vijayakumar Deshmukh; BJP aggressive in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.