गोंदवलेल्या ‘आई’ या शब्दामुळे कोल्हापूरच्या चोराला सोलापुरात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:41 PM2019-12-21T12:41:09+5:302019-12-21T12:44:57+5:30

सोलापूर शहर गुन्हे शाखेची कामगिरी : २७१ ग्रॅम सोन्यासहित ८ लाखांचा ऐवज जप्त

The deceased 'mother' caught the thief of Kolhapur in Solapur | गोंदवलेल्या ‘आई’ या शब्दामुळे कोल्हापूरच्या चोराला सोलापुरात पकडले

गोंदवलेल्या ‘आई’ या शब्दामुळे कोल्हापूरच्या चोराला सोलापुरात पकडले

Next
ठळक मुद्देसोलापूर शहरात भरदिवसा घरफोडीचे प्रकार घडले होतेकुमठा नाका येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी पांढºया रंगाच्या दुचाकीवरून येणार ८ लाख २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

सोलापूर : शरीरावर गोंदवलेल्या ‘आई’ या शब्दामुळे रेल्वे बदलून सोलापुरात येऊन चोरी करणाºया कोल्हापुरातील चोरालासोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे़ त्याच्याकडून २७१ ग्रॅम सोन्यासह ८ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ राजू उर्फ राजवीर सुभाष देसाई उर्फ नागरगोजे (वय ३२, रा़ सावंत गल्ली, उचगाव, ता़ करवीर, जि़ कोल्हापूर) या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.

सोलापूर शहरात भरदिवसा घरफोडीचे प्रकार घडले होते़  राजू सुभाष देसाई उर्फ नागरगोजे (रा. कोल्हापूर) हा सोन्याचे दागिने विकण्याकरिता देगाव मार्गे सोलापूर शहरातून उस्मानाबादकडे जाणार आहे, पण त्यापूर्वी तो कुमठा नाका येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी पांढºया रंगाच्या दुचाकीवरून येणार आहे, अशी माहिती गुप्तहेरांकडून मिळाली़ त्याला सापळा रचून पकडले. 

राजूकडे अधिक चौकशी केली असता त्याने  सोलापूर शहरातील विविध पोलीस हद्दीमध्ये घरफोडी व वाहन चोरल्याचे कबूल केले़ आरोपी राजू याच्याकडून २७.१ तोळे सोन्याचे दागिने, ७४ हजार रुपये रोख आणि चाळीस हजार रुपये किमतीचे मोटरसायकल असा एकूण ८ लाख २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहा़ पोलीस आयुक्त अभय डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शैलेश खेडकर, अशोक लोखंडे, दिलीप किर्दक, इमाम जमादार, शंकर मुळे, राजेश चव्हाण, विजयकुमार वाळके, संतोष येळे, संदीप जावळे, सचिन होटकर,  सुहास अर्जुन, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, रणजित परिहार, सारिका लोखंडे, संजय काकडे, विजय निंबाळकर, प्रफुल्ल गायकवाड यांनी पार पाडली़ 

दुपारीच करायचा राजू चोरी
- राजू देसाई हा कोल्हापूरचा सराईत गुन्हेगार आहे़ तेथे अनेक गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत़ यामुळे कोणताही गुन्हा घडला की पोलीस त्याच्यावर संशय घेत होते़ यामुळे त्याने आपला मोर्चा सोलापूरकडे वळवला़ सोलापुरात अनेक ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांचा तपास करताना चोराच्या शरीरावर ‘आई’ असे गोंदवलेले आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली़ यावरूनच पोलिसांनी त्या चोराचा छडा लावला़ तो सोलापुरात दुपारी बारा ते तीनदरम्यानच बंद घर बघून घरफोडी करत असताना हातमोजे घालत होता़, अशी माहिती पोलीसांनी दिली़

Web Title: The deceased 'mother' caught the thief of Kolhapur in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.