महावितरणचा निर्णय; सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

By Appasaheb.patil | Published: February 25, 2023 01:46 PM2023-02-25T13:46:59+5:302023-02-25T13:47:12+5:30

वीज ग्राहकांना वेळेत चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोईचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र येत्या मार्च

Decision Electricity bill payment center will be open on holidays mahavitaran | महावितरणचा निर्णय; सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

महावितरणचा निर्णय; सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

googlenewsNext

सोलापूर :

वीज ग्राहकांना वेळेत चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोईचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र येत्या मार्च अखेरपर्यंत शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात महावितरणची थकबाकी वाढलेली असून थकबाकी वसूल करण्याची मोहीम सुरु आहे. थकबाकीदार ग्राहकांचा थकबाकीपोटी वीज खंडित करण्यात येत आहे. चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोईचे व्हावे म्हणून साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रे चालू असणार आहे.

थकबाकीदार सर्व वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या बिलांचा भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अँपद्वारे ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. सोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधीत वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.

Web Title: Decision Electricity bill payment center will be open on holidays mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.