सोलापुरात कडक संचारबंदीचा निर्णय; भाजीपाला, किराणा खरेदीसाठी मोठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 12:30 PM2021-05-07T12:30:01+5:302021-05-07T12:31:00+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
सोलापुरात कडक संचारबंदीचा निर्णय; भाजीपाला, किराणा खरेदीसाठी मोठी गर्दी
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात ८ ते १५ मे पर्यंत कडक संचारबंदीचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरूवारी सायंकाळी घोषित केली. त्यानंतर आज शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून सोलापूर शहरात किराणा व भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी शहरातील विविध बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती.
कुंभार वेस, लक्ष्मी मार्केट, होम मैदान, जुळे सोलापूर, सत्तर फुट रोड, मार्केट यार्ड आदी बाजारपेठेत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बाजार समितीत अचानक आवक वाढल्याने वाहनांची गर्दी वाढली, सत्तर फुट रोड व कुंभार वेस येथे वाहतुक कोंडी झाली होती. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी १५ मे पर्यंत कडक निर्बंध घोषित केल्याने नागरिकांनी शुक्रवारी मोठी तारांबळ उडाली होती. वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.