लोकन्यायालयाचा निर्णय मान्य : सुशीलकुमार शिंदे
By appasaheb.patil | Published: May 23, 2019 08:21 PM2019-05-23T20:21:00+5:302019-05-23T20:22:58+5:30
सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदेंचा दुसºयांदा पराभव
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी यांचे अभिनंदन करून लोक न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभव स्वीकारावा लागला आहे़ पराभव स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, मतदारसंघातील जनतेचे मनापासून आभार मानतो़ लोक न्यायालयाचा हा निर्णय मान्य असून यापुढेही सोलापूरच्या जनतेसाठी कार्य करीत राहणार आहे. आतापर्यंत मला जी सेवा करण्याची संधी दिली़ त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे़ यापुढेही काँग्रेसचे काम करीतच राहीन, जिथे जिथे शक्य असेल तेथे तिथे मी आपली सेवा अर्पण करेन असेही शिंदे म्हणाले.