महाळूंग-श्रीपूर ग्रामपंचायत निवडणूक न लढवण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:18 AM2020-12-26T04:18:11+5:302020-12-26T04:18:11+5:30
सदर बैठकीला रामचंद्र सावंत-पाटील, संभाजी जाधव, भीमराव रेडे-पाटील, नानासाहेब मुंडफणे, अनिल जाधव, राहुल रेडे, सुभाष जाधव, दिलीप रेडे, रावसाहेब ...
सदर बैठकीला रामचंद्र सावंत-पाटील, संभाजी जाधव, भीमराव रेडे-पाटील, नानासाहेब मुंडफणे, अनिल जाधव, राहुल रेडे, सुभाष जाधव, दिलीप रेडे, रावसाहेब सावंत-पाटील, विजय भोसले, दत्तात्रय मुंडफणे, अरुण पवार, मौला पठाण, देवीदास काळे, राजकुमार शिंदे, सुहास गाडे, रमेश देवकर, अशोक रेडे-पाटील, सुरेश गुंड-पाटील, सतीश लांडगे, अरुण तोडकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. त्याबाबत निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही आदेश संबंधित ग्रामपंचायतींना केलेला नाही. यामुळे संपूर्ण गावामध्ये नगरपंचायत की ग्रामपंचायत? निवडणूक असा संभ्रम निर्माण झाला आहे.
निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याची केली विनंती
निवडणूक आयोगाने येथील निवडणुका रद्द केल्या नाहीत. ग्रामपंचायतींमध्ये आता निवडणुका झाल्या आणि त्यानंतर विभागाने रूपांतरणाची कार्यवाही केल्यावर या ग्रामपंचायतींचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. त्यामुळे तेथे नव्याने स्थापित होणाऱ्या नगरपंचायत निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. सरकारचा या निवडणुकांवर दुहेरी खर्च होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांकडून न्यायालयात जाण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. त्यामुळे या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती सरकारने केली आहे.