अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त विठ्ठल मंदिरात दुर्वांची आरास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:40 AM2021-03-04T04:40:21+5:302021-03-04T04:40:21+5:30
प्रत्येक हिंदू सण, उत्सव, स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी आकर्षक फुलांची सजावट करण्याचे काम श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने ...
प्रत्येक हिंदू सण, उत्सव, स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी आकर्षक फुलांची सजावट करण्याचे काम श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात दुर्वांची सजावट करण्यात आले.
वडगाव-धायरी (पुणे) येथील श्रीमंत मोरया ग्रूरुपच्या वतीने उद्योजक सचिन चव्हाण, संदीप पोकळे, प्रकाश पोकळे यांनी मंदिरातील सजावटीचा खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली. याची दाखल घेत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी मोरया ग्रूपला सेवा करण्याची संधी दिली. अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त विठ्ठल मंदिरात दुर्वांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला. विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात या सजावटीमुळे परिसर हिरवाईनं नटल्याचे चित्र पहायला मिळाले. यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना अधिकच प्रसन्न वाटत होते.
फोटो : श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यात अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त करण्यात आलेली दुर्वाची सजावट.