गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेस फुलांची आरास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:20 AM2021-04-14T04:20:39+5:302021-04-14T04:20:39+5:30
कोरोनामुळे मंदिर बंद असले, तरीही काही प्रथा, परंपरा मात्र सुरूच आहेत. गुढीपाडव्याच्या खास दिवसानिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल आणि रुक्मिणी ...
कोरोनामुळे मंदिर बंद असले, तरीही काही प्रथा, परंपरा मात्र सुरूच आहेत. गुढीपाडव्याच्या खास दिवसानिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरात फुलांची नयनरम्य आरास केल्याचे पाहायला मिळत आहे. झेंडूच्या फुलांचा वापरत करत, सुरेख अशा रंगसंगतीने ही आरास साकारण्यात आली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे रूढी व परंपरेनुसार मंदिरातील सण व उत्सव साजरे करण्यात येतात.
हिंदू धर्मानुसार भागवत सांप्रदायाचे प्रतीक असलेला भगवा ध्वज (ब्रह्मध्वज) श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील ध्वजस्तंभावर वर्षभर लावण्यात येतो.
त्यानुसार, हिंदू नववर्षारंभानिमित्त मंगळवारी सकाळी ९ वाजता मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्री विठ्ठल मंदिरातील ध्वजाची पूजा करण्यात आली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठल ध्वजस्तंभ, श्री रुक्मिणी गोपूर व श्रीसंत नामदेव पायरीच्या बाजूस अशा तीन ध्वजांची पूजा करून नवीन ध्वज लावण्यात आले.
फोटो :::::::::::::
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील ध्वजाची पूजा करताना कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी.