निर्जला एकादशीनिमित्त श्री विठ्ठल मंदिरात फुलांची आरास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:08+5:302021-06-22T04:16:08+5:30
प्रत्येक हिंदू सण, उत्सव, स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन या दिवशी आकर्षक फुलांची सजावट करण्यास श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ...
प्रत्येक हिंदू सण, उत्सव, स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन या दिवशी आकर्षक फुलांची सजावट करण्यास श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सुरू करण्यात आली आहे.
याचा एक भाग म्हणून निर्जला एकादशीनिमित्त ही विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्याचे आयोजन केले होते. यामुळे वडगाव धायरी (पुणे) येथील उद्योजक सचिन चव्हाण, संदीप पोकळे यांनी मंदिरातील फुलांच्या सजावटीचा खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली. याची दाखल घेत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सचिन चव्हाण यांना सजावट करण्याची संधी दिली.
ऑरकेट, गुलाब, कामिनी, गुलछडी, पिकं डीजे, झेंडू अशा ५०० किलो फुलांची सजावट श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा गाभारा, नामदेव पायरी, सोळखांबी परिसरात करण्यात आली आहे. यामुळे मंदिर अधिक आकर्षक दिसत होते.