कोरोना संसर्गामध्ये घट... करमाळकरांना दिलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:23 AM2021-05-07T04:23:34+5:302021-05-07T04:23:34+5:30

कडक निर्बंधांचा फायदा होत असून, नागरिकांना प्रशासनाच्या नियमानुसार वाटचाल केल्यास कोरोना आटोक्यात येऊ शकतो, असे मत तालुका आरोग्य अधिकारी ...

Decrease in corona infection ... Consolation to Karmalkars! | कोरोना संसर्गामध्ये घट... करमाळकरांना दिलासा!

कोरोना संसर्गामध्ये घट... करमाळकरांना दिलासा!

Next

कडक निर्बंधांचा फायदा होत असून, नागरिकांना प्रशासनाच्या नियमानुसार वाटचाल केल्यास कोरोना आटोक्यात येऊ शकतो, असे मत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सागर गायकवाड यांनी सांगितले. आतापर्यंत ९४०२ जणांनी पहिला डोस घेतला असून, दुसरा डोस २०१४ जणांनी घेतला आहे.

तालुक्यात आतापर्यंत आरटीपीसीआरच्या ६८६३ तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी ७३४ जण पॉझिटिव्ह तर रॅपिड तपासणी ५४१०२ जणांची करण्यात आली. त्यातील ५१४२ जण पॉझिटिव्ह आढळले. एकूण ५८७६ पॉझिटिव्ह असून त्यापैकी ४९९९ उपचार घेऊन घरी गेले आहेत तर १३३ जणांचा मृत्यू झाला आहे. ७४४ जणांवर उपचार सुरू आहेत, तर ३३ जणांना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे.

-----

येथे घेताहेत रुग्ण उपचार

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कोविड सेंटरची क्षमता १५० असून तेथे ४०३ रुग्ण दाखल आहेत. आंबेडकर प्रशालेची क्षमता ८० तेथे १८५ जण, प्रगती विद्यालय मांगी क्षमता ५० तेथे २२ जण, जि.प. शाळा वीट क्षमता ५० - अद्याप दाखल नाहीत. नागनाथ मतिमंद विद्यालय क्षमता ५० - दाखल नाही. डॉ. कदम हायस्कूल वांगी नं. १ क्षमता ५० - दाखल ३, कमलाई हॉस्पिटल क्षमता २५ - दाखल २६, कुटीर रुग्णालय क्षमता १० - दाखल २७, शहा हॉस्पिटल १० तेथे ४१, लोकरे हॉस्पिटल १५ तेथे २१, शेलार हॉस्पिटल १० तेथे १६ रुग्ण दाखल आहेत.

----

Web Title: Decrease in corona infection ... Consolation to Karmalkars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.