सोलापूर शहरातील कोरोना रूग्णांची संख्येत घट; दोन क्वारंटाईन सेंटर केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:26 PM2020-09-30T12:26:06+5:302020-09-30T12:28:16+5:30

एकच सिंहगड क्वारंटाईन सेंटर चालणार; प्रत्येकी ५० बेडचे दोन हॉस्पिटल साकारणार

Decrease in the number of corona patients in Solapur city; Two quarantine centers closed | सोलापूर शहरातील कोरोना रूग्णांची संख्येत घट; दोन क्वारंटाईन सेंटर केले बंद

सोलापूर शहरातील कोरोना रूग्णांची संख्येत घट; दोन क्वारंटाईन सेंटर केले बंद

Next
ठळक मुद्देबॉइज हॉस्पिटल आणि विमा हॉस्पिटल (ईएसआय) मध्ये आॅक्सिजनच्या सुविधेसह प्रत्येकी ५० बेड उपलब्ध असणारव्कारंटाइन झालेल्या नागरिकांना नाश्ता-जेवणाची सुविधा दिली जात होती. यातील केवळ दोन व्कारंटाइन सेंटर सुरू राहतील

राकेश कदम

सोलापूर : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्यामुळे महापालिकेने आता केवळ सिंहगड इन्स्टिट्यूट आणि पोलिस प्रशिक्षण केंद्रातील व्कारंटाइन सेंटर नियमित सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बॉइज हॉस्पिटल आणि विमा हॉस्पिटल (ईएसआय) मध्ये आॅक्सिजनच्या सुविधेसह प्रत्येकी ५० बेड उपलब्ध असणार आहेत.

कोरोनाचा शहरात कहर झाल्यानंतर महापालिकेने सिंहगड इन्स्टिट्यूट, पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर विद्यापीठ, भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज केगाव, आॅर्किड कॉलेज तुळजापूर रोड, गर्व्हमेट पॉलिटेक्निक, वालचंद कॉलेज आॅफ इंजनिअरिंग, वाडिया हॉस्पिटल, म्हाडा इमारत जुळे सोलापूर, ए.जी. पाटील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग या १० इमारतींमध्ये व्कारंटाइन सेंटर्स सुरू केली होती. यातील सिंहगड, वाडिया, आॅर्किडमध्ये कोरोना केअर सेंटर होते.

कोरोनाबाधीत रुग्णांना या ठिकाणी पाठवले जायचे. येथे नियंत्रण अधिकारी, सहनियंत्रण अधिकारी, डॉक्टर, परिचारिका यांच्यासह इतर कर्मचा?्यांची नियुक्ती केली होती. व्कारंटाइन झालेल्या नागरिकांना नाश्ता-जेवणाची सुविधा दिली जात होती. यातील केवळ दोन व्कारंटाइन सेंटर सुरू राहतील, असे आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी सांगितले. इतर ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना आपल्या मूळ ठिकाणावर पाठवण्यात येईल. डॉक्टरांना इतर ठिकाणांवर कामे सोपवली जातील.

महापालिकेने कमी कालावधीत बॉईस हॉस्पिटलमध्ये कोवीड केअर सेंटर उभारले आहे. दोन आॅक्टोबरला ते कार्यान्वित होईल. ज्यांना आॅक्सिजनची आवश्यकता आहे त्यांना या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येईल. येथे नियमित तज्ञ डॉक्टरही उपलब्ध असतील. ईएसआयमध्येही ५० बेड उपलब्ध करुन देण्यात येईल. यामुळे सिव्हील हॉस्पिटलवरचा ताण कमी होईल.बॉईस हॉस्पिटलचे दोन आॅक्टोबरला कार्यान्वित होईल.   
- डॉ. शितलकुमार जाधव, आरोग्य अधिकारी, मनपा.

शहरातील कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आला आहे. परंतु, आॅगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये रुग्ण वाढले आहेत. गेल्या महिनाभरात उत्सव आणि इतर कारणांमुळे लोकांनी फिजीकल डिस्टन्स पाळला नाही. कोरोना नियंत्रणात आला असली तरी महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क आणि सक्षम राहावी यासाठी कोरोना केअर सेंटर सुरू केली आहेत.
पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा. 

Web Title: Decrease in the number of corona patients in Solapur city; Two quarantine centers closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.