ज्वारीच्या कोठारात प्रतिएकर उत्पन्नात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:22 AM2021-03-16T04:22:56+5:302021-03-16T04:22:56+5:30
मंगळवेढा शहरात १६ हजार एकरांचे क्षेत्र आहे. यामध्ये हरभरा, करडई, जवस आणि ज्वारी ही पिके नेहमीच नैसर्गिकरीत्या पेरणी ...
मंगळवेढा शहरात १६ हजार एकरांचे क्षेत्र आहे. यामध्ये हरभरा, करडई, जवस आणि ज्वारी ही पिके नेहमीच नैसर्गिकरीत्या पेरणी झाल्यापासून आपोआप येतात. मात्र काळ्या शिवारामध्ये नैसर्गिक येणाऱ्या शेतामध्ये शेतकऱ्यांनी हळूहळू ऊस पिकांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्वारीच्या उत्पन्नात हळूहळू घट होत आहे.
सध्या नवीन ज्वारी तीन हजार रुपये ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळत आहे. कडब्याला हजार पेंडीला नऊ ते १२ हजार रुपयांपर्यंत दर आहे. हा कडबा सातारा, कोल्हापूर, कराड, सांगली, माण, खटाव या दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात विकला जातो. हा व्यवसाय करणारे अनेक व्यापारी मंगळवेढा तालुक्यातील आहेत.
बाजारात ज्वारीची आवक वाढू लागली
सध्या मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक हळूहळू वाढत आहे. ज्वारीचा लिलाव हा प्रत्येक मंगळवारी होत असून, यामध्ये घाऊक व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने ज्वारी विकत घेण्यासाठी सामील होतात. तसेच हरभरा, करडई यांचीही लिलाव पद्धतीने विक्री केली जात आहे.
कोट :::::::::::
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी यावर्षी ज्वारी, हरभरा, करडई या धान्यांची विक्री होण्यासाठी नियोजन केले आहे.
- सोमनाथ आवताडे
सभापती, बाजार समिती