उजनीत फ्लो कमी झाला; धरण २९ टक्क्यांवर
By काशिनाथ वाघमारे | Published: September 29, 2023 07:23 PM2023-09-29T19:23:05+5:302023-09-29T19:23:25+5:30
पिण्याचे पाणी आणि शेतीला पाणी मुद्यावरुन उजनीतील साठ्याचा प्रश्न चर्चेला येतोय.
काशिनाथ वाघमारे, सोलापूर : उजनी लाभक्षेत्रातील वरील बाजूस होणारा पाऊस कमी झाल्याने फ्लोदेखील कमी झाला आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये चार ते पाच दिवस पाऊस झाल्याने उजनीतील टक्केवारी वाढली आहे. जवळपास २९ टक्के उजनी धरण भरत आले आहे.
गुरुवारी सायंकाळी वरील धरणामध्ये होणारा विसर्ग हा १८ हजार ३०० हजार इतका होता. पण हा विसर्ग कमी होऊन १५ हजार ४०० झाला आहे. सध्या उजनी धरणाची एकूण जलासाठा ७९ टीमीएसी तर आणि उपयुक्त साठा हा १५.३९ टीएमसी इतका आहे. अनेक दिवंसापासून पावसाचा खंड पडल्याने पिण्याचे पाणी आणि शेतीला पाणी मुद्यावरुन उजनीतील साठ्याचा प्रश्न चर्चेला येतोय.