करमाळा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:22 AM2021-04-27T04:22:26+5:302021-04-27T04:22:26+5:30
या वेळी तहसीलदार समीर माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, मुख्याधिकारी वीणा पवार, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे, ...
या वेळी तहसीलदार समीर माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, मुख्याधिकारी वीणा पवार, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, श्रेणीक खाटेर, माजी उपनगराध्यक्ष ॲड. कमलाकर वीर, पंचायत समिती सदस्य ॲड. राहुल सावंत, माजी पं.स. सदस्य विलास पाटील, आदिनाथ कारखान्याचे संचालक चंद्रहास निमगिरे, रावगावचे सरपंच दादासाहेब जाधव, वाहतूक संस्थेचे चेअरमन सुजीत बागल, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कोळेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जयवंतराव जगताप यांनी सद्य:स्थितीत सकारात्मक मानसिकता राहणे हेच कोरोनावरील प्रभावी औषध आहे. तसेच त्यांनी लसीकरण, ऑक्सिजन व आयसोलेशन बेड, रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता व पुरवठा, अन्य सुविधांबाबतची पाहणी करून आढावा घेतला. लसीकरणावेळेची गर्दी टाळण्यासाठी प्रथम डोस व द्वितीय डोससाठी आठवड्यातील दिवस ठरविण्याबाबत सूचना केली.
फोटो
२६करमाळा-ॲम्ब्युलन्स
ओळी
करमाळा उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज रुग्णवाहिकेच्या लोकार्पणप्रसंगी माजी आ. जयवंतराव जगताप, तहसीलदार समीर माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, मुख्याधिकारी वीणा पवार, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे आदी.