बार्शीत कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:40 AM2021-02-18T04:40:33+5:302021-02-18T04:40:33+5:30

यावेळी ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. बी. वाय. यादव, उद्योजक अनिल बंडेवार, नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, अशोक कुंकूलोळ, शिवसेनेच ...

Dedication of Barshit Cardiac Ambulance | बार्शीत कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण

बार्शीत कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Next

यावेळी ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. बी. वाय. यादव, उद्योजक अनिल बंडेवार, नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, अशोक कुंकूलोळ, शिवसेनेच शहराध्यक्ष दीपक आंधळकर, ट्रस्टचे अध्यक्ष कमलेश मेहता, पारस कांकरिया आदी उपस्थित होते.

यावेळी सोपल यांनी आपल्या भाषणातून बार्शीतील कुंकूलोळ घराणे दानशूर घराणे म्हणून ओळखले जाते. आता मोक्षधामला जाण्याची वेळ कोणावर येवू नये म्हणून त्यांनी कार्डियाक दिली आहे. या मदतीमुळे लोकांना खरोखर आधार मिळाला आहे. बार्शीत लवकरच ट्रामा सेंटरची अद्ययावत सोय उपलब्ध होईल त्यासाठी या रुग्णवाहिकेचा चांगला उपयोग होईल, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

----

आणखी दहा रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न

डॉ. बी. वाय. यादव म्हणाले ४५ वर्षांच्या वैद्यकीय क्षेत्रात माझ्यासह कै. डॉ. कश्यपी, कै. डाॅ. नेने, कै. डॉ. हिरेमठ साक्षीदार आहेत. कित्येकांना केवळ उपचारासाठी वेळेत पोहोचता आले नाही म्हणून मरण पत्करावे लागले. आता कुंकुलोळ परिवाराने दिलेल्या रुग्णवाहिकेचे योगदान मोलाचे आहे. बार्शीसारख्या ठिकाणी आणखी किमान दहा रुग्णवाहिकेची गरज आहे. यासाठी बार्शीतील वैद्यकीय क्षेत्र प्रयत्न करत आहे.

१७बार्शी-ॲम्बुलन्स

-----

Web Title: Dedication of Barshit Cardiac Ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.