बार्शीत महिला-पुरुष जीमचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:55 AM2021-01-13T04:55:33+5:302021-01-13T04:55:33+5:30

यावेळी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, शिवशक्ती बँकेचे चेअरमन डॉ प्रकाश बुरगुटे, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले,रमेश पाटील, शिवाजी शिक्षण संस्थेचे ...

Dedication of Barshit Women's-Men Gym | बार्शीत महिला-पुरुष जीमचे लोकार्पण

बार्शीत महिला-पुरुष जीमचे लोकार्पण

Next

यावेळी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, शिवशक्ती बँकेचे चेअरमन डॉ प्रकाश बुरगुटे, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले,रमेश पाटील, शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक जयकुमार शितोळे, महिला बालकल्याण सभापती पुष्पा वाघमारे, अरुण बारबोले, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, गटनेते दीपक राऊत, विजय चव्हाण, कय्युम पटेल, संदेश काकडे, संतोष बारंगुळे, रितेश वाघमारे, पाचू उघडे, डी. एम. मोहिते, संतोष शहा, हेमंत शिंदे, बबन पाटील उपस्थित होते.

बागेचे नूतनीकरण केल्याबद्दल

धनगर समाजाच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत आणि नगराध्यक्ष तांबोळी यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की आम्ही लक्ष्मी तीर्थ विहिरींचा गाळ काढला. त्या बागेचेही नुतनीकरण केले आहे. संकेश्वर उद्यान व इतर बागा ही लवकर खुल्या केल्या जातील. या बागांच्या देखभालीसाठी ५० लाखांची तरतूद केली आहे. सामाजिक संस्थांनी बागा देखभालीसाठी पुढे यावे. विरोधकांवर बोलताना ते म्हणाले राजकारण करायच्या वेळी करा. मात्र जनतेच्या कामात राजकारण करू नको. विरोधक राजकीय दबाव टाकून कामे अडवण्याचे काम करत आहेत असा आरोप आ. त्यांनी केला.

सूत्रसंचालन श्रीधर कांबळे यांनी केले तर आभार विजय राऊत यांनी मानले.

निधी आणला तर तुमचा सत्कार करतील

बार्शी-सोलापूर आणि परांडा उस्मानाबाद या दोन्ही रस्त्यांना मी माजी आमदार असताना भाजप सरकार कडून निधी आणला. विरोधकांनी विनाकारण जनतेस वेठीस धरण्याचे काम करू नये. माजी आमदारांनी ही तालुक्याच्या विकासासाठी निधी आणावा. आमचे नगराध्यक्ष आणि सभापती तुमचा सत्कार करतील. दररोज लाईव्ह येऊन बडबड करणारे कधी नगरसेवक ही होऊ शकणार नाहीत आणि आमदारकीची स्वप्ने पाहत आहेत अशी टीका त्यांनी केली.

फोटो

०९बार्शी-जीम

ओळी

बार्शीत महिला-पुरुष ओपन जीमच्या उद्घाटनप्रसंगी आ. राजेंद्र राऊत, ॲड. आसिफ तांबोळी, डॉ. प्रकाश बुरगुटे, विश्वास बारबोले, रमेश पाटील, जयकुमार शितोळे, पुष्पा वाघमारे, अरुण बारबोले, अमिता दगडे-पाटील, कृष्णराज बारबोले, दीपक राऊत आदी.

Web Title: Dedication of Barshit Women's-Men Gym

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.