फिरता पशुवैद्यकीय दवाखाना, १०२ रुग्णवाहिकेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:22 AM2021-05-23T04:22:09+5:302021-05-23T04:22:09+5:30

याप्रसंगी माजी आ. दीपक साळुंखे-पाटील, चंद्रकांत देशमुख, सभापती राणी कोळवले, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबर, कृषी व पशुसंवर्धन सभापती ...

Dedication of Mobile Veterinary Dispensary, 102 Ambulances | फिरता पशुवैद्यकीय दवाखाना, १०२ रुग्णवाहिकेचे लोकार्पण

फिरता पशुवैद्यकीय दवाखाना, १०२ रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Next

याप्रसंगी माजी आ. दीपक साळुंखे-पाटील, चंद्रकांत देशमुख, सभापती राणी कोळवले, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबर, कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल मोटे, जिल्हा परिषद सदस्य ॲड. सचिन देशमुख, नगरसेवक सोमेश यावलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सीमा दोडमणी, उपसभापती तानाजी चंदनशिवे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम फुले, डॉ. श्रीकांत सुर्वे, डॉ. अस्लम सय्यद आदी उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या काळात गंभीर रुग्णास जिल्हा अथवा तालुक्याबाहेर अन्य ठिकाणी हलविण्यासाठी १०२ अत्याधुनिक रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जीव वाचविणे हाच प्रयत्न राहणार आहे. तर केंद्रीय आरोग्य विभागाकडे केलेल्या पत्रव्यवहाराला यश मिळाले. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत तालुक्यातील जनावरांवर तातडीने उपचार होण्यासाठी सुसज्ज फिरता पशुवैद्यकीय दवाखाना मिळाला आहे, असे आ. शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही एक कार्डियाक रुग्णवाहिका सांगोला तालुक्यासाठी दिली आहे. यापुढील काळात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, आरोग्य विभागातील रिक्त पदे भरून सांगोला तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला जाईल.

- आ. शहाजीबापू पाटील

आमदार, सांगोला

Web Title: Dedication of Mobile Veterinary Dispensary, 102 Ambulances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.