रेशनकार्डासाठी दिलेला फोटो इतरांना दाखवत महिलेची बदनामी, तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल 

By रूपेश हेळवे | Published: May 17, 2023 05:58 PM2023-05-17T17:58:17+5:302023-05-17T17:58:52+5:30

फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Defamation of woman by showing photo given for ration card to others, case of molestation against young man | रेशनकार्डासाठी दिलेला फोटो इतरांना दाखवत महिलेची बदनामी, तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल 

रेशनकार्डासाठी दिलेला फोटो इतरांना दाखवत महिलेची बदनामी, तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल 

googlenewsNext

सोलापूर : पीडित महिलेने रेशन कार्ड काढण्यासाठी घेतलेल्या फोटो पाकिटात ठेवून घेत. तो फोटो इतरांना दाखवत ही माझी मैत्रिणी आहे, म्हणत पीडितेची बदनामी केली. शिवाय पीडितेचा हात पकडल्या प्रकरणी तरूणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ३५ वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी प्रशांत शितोळे ( रा. पाटील नगर) याच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पीडितेने आरोपीला रेशनकार्ड व निराधार योजनेचे कार्ड काढण्यासाठी सांगितले हाेते. त्यावेळी आरोपी प्रशांत याने पीडितेचा मोबाईल नंबर घेऊन त्यांना फोन करत होता. शिवाय काही महिन्यापूर्वी पीडिता ही बाळे येथून कामाला जाण्यासाठी रिक्षा पकडताना आरोपी हा पीडितेजवळ येऊन तू माझ्या बरोबर चल म्हणत पीडितेचा हात धरला.

त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने पीडितेचा हात पकडून तू माझ्या सोबत चल नाहीतर माझे डोके फोडून घेतो म्हणाला. त्यावेळी पीडिता ही जात असताना आरोपीने भिंतीवर डोके आपटून घेतले, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी प्रशांत शितोळेवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Defamation of woman by showing photo given for ration card to others, case of molestation against young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.