गौडगावच्या शिवाजी संस्थेच्या बदनामीबद्दल २५ लाखांचा अब्रू नुकसानीचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:27 AM2021-09-17T04:27:33+5:302021-09-17T04:27:33+5:30
या प्रकरणाची सविस्तर हकिकत अशी की, बार्शी तालुक्यातील गौडगाव येथे लोहोकरे गुरुजी यांनी १९४३ साली स्थापन केलेली शिक्षण संस्था ...
या प्रकरणाची सविस्तर हकिकत अशी की, बार्शी तालुक्यातील गौडगाव येथे लोहोकरे गुरुजी यांनी १९४३ साली स्थापन केलेली शिक्षण संस्था आहे. या संस्थेची बदनामी करण्याच्या हेतूने माहिती अधिकाराचा दुरुपयोग करून ‘या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे.’ मशा मजकुराचा अर्ज काकडे यांनी २ जुलै २०२० रोजी धर्मादाय आयुक्त यांना दिला. तसेच १५ जुलै २०२० रोजी रोजी काकडे उपोषणास बसले व गौडगाव येथील उपोषणस्थळी जमाव बोलावून संस्था व पदविकाऱ्यांची बदनामी करणारे भाषण केले. म्हणून काकडे यांच्या विरुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायकराव गरड यांनी बार्शी येथील फौजदारी न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला.
या प्रकरणी फिर्यादी संस्थेचे वतीने ॲड. प्रशांत शेटे यांचा युक्तिवाद मान्य करून करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. सबनीस यांनी भा.दं.वि. कलम ५०० अन्वये फौजदारी खटला प्रक्रिया सुरू करून आरोपीस कोर्टात हजर करण्याचे आदेश पारीत केले आहेत. याचबरोबर संस्थेच्या वतीने संस्थेच्या झालेल्या बदनामीमुळे २५ लाख रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावाही बार्शीतील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दाखल केला आहे. या दाव्यात काकडे यांना हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.
---