शिवाजी शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत प्रकाश बुरगुटे यांचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:16 AM2021-06-28T04:16:54+5:302021-06-28T04:16:54+5:30
पंधरापैकी सात जागा झाल्या होत्या बिनविरोध, आठ जागांसाठी लागली होती निवडणूक लोकमत न्यूज नेटवर्क बार्शी :- सोलापूर व उस्मानाबाद ...
पंधरापैकी सात जागा झाल्या होत्या बिनविरोध, आठ जागांसाठी लागली होती निवडणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी :- सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत आठ जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली. यात डॉ. प्रकाश बुरगुटे यांना सर्वांत कमी मते मिळाल्याने पराभवास सामोरे जावे लागले, तर पी. टी. पाटील आणि जयकुमार शितोळे यांना सर्वाधिक २८ मते मिळाली. याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भागवत चव्हाण यांनी दिली.
या निवडणुकीत पंधरा जागांपैकी सात जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर उर्वरित आठ जागांसाठी नऊ अर्ज असल्याने निवडणूक लागली होती. यावर्षी प्रथमच राजेंद्र पवार व तानाजी शिनगारे या दोघांना कार्यकारी मंडळात संधी मिळाली आहे.
---
सात जण बिनविरोध
यंदाच्या निवडणुकीत पेट्रन गटातून डॉ़ बी. वाय़. यादव, व्हाइस बेनिफॅक्टर गटातून डॉ़ गुलाबराव पाटील,
व्हाइस पेट्रन फेलो गटातून तानाजी शिनगारे, कायम सभासद गटातून राजेंद्र पवार, डॉ. विलास देशमुख, लाइफ वर्कर गटातून विष्णू पाटील व दिलीप रेवडकर हे सात जण बिनविरोध झाले होते.
--
अशी पडली मते
पहिला वर्ग व दुसरा वर्ग प्रवर्गातील आठ जागांसाठी सुरेश पाटील-२६, प्रकाश पाटील-२८, नंदकुमार जगदाळे-२३, शशिकांत पवार-२४, अरुण देबडवार-२६, जयकुमार शितोळे-२८ सोपान मोरे-२५, दिलीप मोहिते-२६ व डॉ. प्रकाश बुरगुटे-१४ हे नऊ उमेदवार निवडणुकीत उभे होते. ३३ सभासदांपैकी आज झालेल्या मतदानात ३० जणांनी मतदान केले.