डिझाईनमध्ये पदवी म्हणजे कल्पनांचे प्रकटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:27 AM2021-06-09T04:27:27+5:302021-06-09T04:27:27+5:30

शिक्षक/ विद्यार्थी/ पालकांनो नवनिर्मितीचा आनंद देणाऱ्या डिझाईन क्षेत्रात हार्दिक स्वागत..! आम्ही तुम्हाला भारतातील अग्रगण्य डिझाईन एंट्रन्स कोचिंग सेंटरचे लाभार्थी ...

A degree in design is a manifestation of ideas | डिझाईनमध्ये पदवी म्हणजे कल्पनांचे प्रकटीकरण

डिझाईनमध्ये पदवी म्हणजे कल्पनांचे प्रकटीकरण

Next

शिक्षक/ विद्यार्थी/ पालकांनो नवनिर्मितीचा आनंद देणाऱ्या डिझाईन क्षेत्रात हार्दिक स्वागत..!

आम्ही तुम्हाला भारतातील अग्रगण्य डिझाईन एंट्रन्स कोचिंग सेंटरचे लाभार्थी होण्यासाठी आमंत्रित करीत आहोत. भंवर राठोड डिझाईन स्टुडिओच्या BRDS सोलापूर शाखेत तुमचे मनापासून स्वागत..! सृजनशीलतेला भाषेची, स्थानाची आणि कमाईचीदेखील कसलीच मर्यादा नसते. एवढेच नव्हे तर अकरावी-बारावीत शास्त्र, वाणिज्य, कला यापैकी कोणत्याही शाखेत शिकत असतानाच पुढील दिशा ठरवण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत.

बारावीनंतर मेडिकल इंजिनिअरिंग, बीकॉम, बीएसस्सी, बीए या पारंपरिक शिक्षणपद्धती ऐवजी आम्ही ११ वी/ १२ वीतच B.des बॅचलर इन डिझाइन या पदवीच्या अभ्यासक्रमासाठी एंट्रन्स एक्झामची पूर्वतयारी करून घेतो. BE/ B.arch/ B.des आदी पदवीधारकांसाठी master of design (M.des) अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्यासाठी BRDS मार्गदर्शन करते.

भारतातील प्रथितयश डिझाईन कॉलेजेस तसेच मान्यवर संस्थांचा विचार केला तर प्रवेशासाठी एंट्रन्स एक्झाम द्यावीच लागते. अधिक जिकरीची बाब म्हणजे प्रत्येक कॉलेज किंवा संस्थेची एंट्रन्स एक्झाम स्वतंत्र आहे. उदाहरणार्थ IIT/NID (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन), NIFT ( नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी) तसेच इतर असंख्य डिझाईन इन्स्टिट्यूट स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम घेऊनच प्रवेश देतात‌. भंवर राठोड डिझाईन स्टुडिओमध्ये NIDs , NIFTs, IITs अशा कॉलेजेसमध्ये शिकलेले आणि विविध कंपन्यांमध्ये तसेच डिझाईन क्षेत्रात कार्यरत असणारे स्कॉलर्स आमच्या फॅकल्टी असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

संगणक तंत्रज्ञान, अवकाश संशोधन अशा प्रत्येक क्षेत्रात आज ज्या गोष्टी चांगल्या वाटतात, परिणामकारक असतात त्या काही कालावधीने कालबाह्य होतात. प्रत्येकाला प्रत्येक बाबतीत अपडेट रहावेच लागते. आधुनिकता अंगी बाणवत असताना प्रत्येक जण स्वतःची हटके स्टाइल आणि डिझाईन असावे यासाठी प्रयत्नशील असतो. म्हणूनच कल्पनाच जिथे जिवंत होतात अशा डिझाईन जगात वावरायचे असेल, शिकायचे असेल तर BRDS शिवाय चांगला पर्याय उपलब्ध नाही.

डिझाईनमध्ये करिअर करण्याचा एकदा निर्णय झाल्यावर प्रॉडक्ट डिझाईन, फॅशन डिझाईन, ग्राफिक डिझाईन, फर्निचर डिझाईन, फॅशन डिझाईन, जेम्स अँड ज्वेलरी डिझाईन, टॉय अँड गेम डिझाईन, लाइफस्टाइल ॲक्सेसरीज डिझाईन, इंडस्ट्रियल डिझाईन, इंटरॅक्शन डिझाईन, यूजर एक्सपीरियंस डिझाईन अशा विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. कल्पना आणि सृजनशीलतेचा योग्य संगम झाल्यावर जे डिझाईन तयार होते ते ग्राहकांना बाजारपेठेला आकर्षित करतेच BRDS च्या सर्वंकष मार्गदर्शनाने डिझाईन शेत्रात पदार्पण केल्यानंतर नवनिर्मितीचा आनंद मिळणारच याची खात्री आम्ही देऊ शकतो. NID च्या परीक्षेत BRDSचे १६३ विद्यार्थी निवडले गेले. त्यापैकी १० विद्यार्थ्यांनी भारतातील पहिल्या १० रँक मिळवीत यशाची कमान गाठली. NIFT निकालाचा विचार केला तर गतवर्षी BRDS च्या ५९० विद्यार्थ्यांनी एंट्रन्समध्ये यश मिळवले. NATA/JEE paper २ मध्येही BRDS च्या देशातील विविध शाखांमधील हजारावर विद्यार्थ्यांनी यश मिळवीत आर्किटेक्चर (B.ARCH) करिअर निवडले.

सोलापूरचे डिझाईन इच्छुक विद्यार्थी एरवी मुंबई ,अहमदाबाद, पुणे येथे जाऊन BRDS मध्ये शिक्षण घेऊन 3 IIT, 2 NID, आणि पाच NIFT मध्ये शिक्षणासाठी पात्र ठरले. हीच संधी आता तुम्हाला सोलापुरात BRDS आल्यामुळे सहज प्राप्त झाली आहे. डिझाईन चित्र निवडणार यांची संख्या सध्या तरी खूपच कमी आहे. covid-19 नंतरच्या बदललेल्या परिस्थितीत डिझायनर्सना मागणी वाढल्याने हे एक आव्हानात्मक व भरभरून रिटर्न्स देणारे क्षेत्र निवडण्याचा पर्याय आमच्या माध्यमातून देत आहोत. इंजिनिअरिंग व इतर क्षेत्रापेक्षा अधिक चांगल्या प्लेसमेंटची संधी डिझाईनवर सना निश्चितच मिळेल. डिझाइन क्षेत्रातील बिगी नर्स ना कंपन्या तुमच्या क्षमता आणि कष्ट करण्याच्या सकारात्मक दृष्टिकोन आवर सरासरी सहा ते दहा लाखांचे स्टार्टिंग पे पॅकेज दते. कल्पनांचे प्रकटीकरण म्हणजे डिझाईन असेही सुटसुटीतपणे म्हणता येईल म्हणूनच वेगळी वाटणारी पण आधुनिक जगातील बदलांना सहजतेने सामोरे जातानाच कल्पकतेतून चित्र रेखाटण्याची तंत्र शिकवणाऱ्या या B.DES / M.DES (बॅचलर / मास्टर ऑफ डिझाईन) मध्ये प्रवेशासाठी सोलापुरातील सात रस्त्यावरील तळवलकर जीमच्या वर चौथ्या मजल्यावरील BRDS च्या स्टुडिओला भेट द्या. अकरावी-बारावीत शास्त्र, वाणिज्य, कला यापैकी कोणत्याही शाखेत शिकत असतानाच पुढील दिशा ठरवण्याची संधी आहे.

Web Title: A degree in design is a manifestation of ideas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.