‘देह’ विक्री सोडली..आता रुग्णांची ‘देह’सेवा केली...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 12:54 PM2020-10-05T12:54:42+5:302020-10-05T12:57:26+5:30

जागतिक वारांगणा व्यवसाय विरोधी दिन : २३१ महिला आल्या समाजाच्या मुख्य प्रवाहात

‘Deh’ has stopped selling..now ‘Deh’ has served the patients ...! | ‘देह’ विक्री सोडली..आता रुग्णांची ‘देह’सेवा केली...!

‘देह’ विक्री सोडली..आता रुग्णांची ‘देह’सेवा केली...!

googlenewsNext
ठळक मुद्देजिथे महिला आज घरात सुरक्षित नाही ते घरदार, नातेवाईक सोडून जेव्हा बाजारात खुलेआम देहविक्री करतातया महिलांना दररोज अन्याय-अत्याचार सहन करावा लागतो. ज्यांना यातून बाहेर पडायचं आहे त्यांना आम्ही अन्य रोजगाराचा मार्ग दाखवतोज्या देहविक्री करतात त्यांच्या अडचणी सोडवतो. ज्यांची इच्छा आहे त्यांना नरकातून बाहेर काढतो

संताजी शिंदे 

सोलापूर : परिस्थितीसमोर शरणागत होऊन वारांगणा बनलेल्या काही महिलांनी ‘देह’ विक्री सोडली... आता रुग्णांची ‘देह’ सेवा करत त्या आयुष्य आनंदाने घालवत आहेत. गेल्या बारा वर्षांत २३१ महिला छोटा-मोठा व्यवसाय करत मुख्य प्रवाहात आल्या आहेत.
सोलापूर शहरासह जिल्ह्यातील देहविक्री करणाºया सुमारे अडीच   हजार वारांगणा आहेत. प्रेमामध्ये दगाफटका, घरची परिस्थिती बिकट, तसेच लहान वयातच वासनेची   शिकार झाल्यामुळे अशा एक ना   अनेक कारणास्तव या मुली देहविक्रीचा व्यवसाय पत्करून वारांगणा झाल्या. आपलं गाव सोडून जिथे कोणी ओळखीचा नाही अशा ठिकाणी जाऊन देहविक्रीचा व्यवसाय करीत आहेत. मराठवाडा, विदर्भ,   मुंबई, पुणे, कर्नाटक अशा अनेक ठिकाणाहून सोलापुरात येऊन देहविक्रीचा व्यवसाय करीत आहेत.

आपण तरुण आहोत तोपर्यंत आपला व्यवसाय चालेल त्यानंतर मग काय करायचं? असा प्रश्न भेडसावणाºया बहुतांश महिलांनी  क्रांती महिला संघटनेकडे यातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली होती. या महिलांना या संंघटनेने रुग्णालयात आयाचे काम दिले. शिवाय भाजीपाला व्यवसाय, हॉटेलमध्ये साफसफाई करणे आदी कामे दिली. सध्याच्या स्थितीमध्ये   १५० महिला अशा पद्धतीने विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. सहा महिलांना चार चाकी वाहनाचे लायसन काढून देण्यात आले आहे. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या वतीने ७५    महिलांची लघु उद्योगाच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. 

नरकातून बाहेर काढतो : रेणुका जाधव
जिथे महिला आज घरात सुरक्षित नाही ते घरदार, नातेवाईक सोडून जेव्हा बाजारात खुलेआम देहविक्री करतात त्यांची अवस्था खूपच बिकट आणि दयनीय आहे. या महिलांना दररोज अन्याय-अत्याचार सहन करावा लागतो. ज्यांना यातून बाहेर पडायचं आहे त्यांना आम्ही अन्य रोजगाराचा मार्ग दाखवतो. ज्या देहविक्री करतात त्यांच्या अडचणी सोडवतो. ज्यांची इच्छा आहे त्यांना नरकातून बाहेर काढतो अशी माहिती क्रांती महिला संघटनेच्या अध्यक्षा रेणुका जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

Web Title: ‘Deh’ has stopped selling..now ‘Deh’ has served the patients ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.