पायी यात्रेसाठी वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:16 AM2021-06-23T04:16:02+5:302021-06-23T04:16:02+5:30

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० प्रमुख संतांच्या पादुका बसने नेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संस्थानांनी स्वीकारला असला ...

A delegation of Warkari sect called on the Governor for a pilgrimage | पायी यात्रेसाठी वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

पायी यात्रेसाठी वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

Next

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० प्रमुख संतांच्या पादुका बसने नेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संस्थानांनी स्वीकारला असला तरी तो वारकरी संप्रदायाला मान्य नाही. पायी वारीसाठी वारकऱ्यांना परवानगी मिळावी, या मागणीसाठी वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने सोमवार रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.

महाराष्ट्राची शेकडो वर्षांची पायी वारीची परंपरा जी निजामांच्या, मुघलांच्या आणि इंग्रजांच्या काळातही खंडित झाली नाही. तिला सलग दुसऱ्या वर्षी खंडित करण्याचे पाप आघाडी सरकारकडून होत आहे. सरकारने निर्बंधांसह ५० वारकऱ्यांच्या पायी वारीला परवानगी द्यावी. ज्ञानोबा- तुकोबांसह ५० वारकऱ्यांना सुरक्षा देणे राज्य सरकारला झेपत नसेल, तर त्यांनी केंद्राकडून सुरक्षा मिळवत ही पायी वारी करावी. वारकऱ्यांच्या भावना समजून घेऊन पायी वारीची परंपरा जोपासण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे निवेदन राज्यपालांकडे करण्यात आले आहे.

यावेळी भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, त्र्यंबकेश्वरचे माजी अध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज धोंडगे, ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर उपस्थित होते.

---

फोटो :

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देताना आचार्य तुषार भोसले, ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, ह.भ.प. संजयनाना महाराज धोंडगे, ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर.

Web Title: A delegation of Warkari sect called on the Governor for a pilgrimage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.