दिल्ली, मुंबई जिंकली; आता गाव जिंंका, ग्रामपंचायती पक्षाच्या चिन्हावर लढणार, सुभाष देशमुख यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 11:00 AM2017-07-22T11:00:45+5:302017-07-22T11:00:45+5:30

-

Delhi, Mumbai won; Now the district will fight on the symbol of Gram Panchayat party, Subhash Deshmukh | दिल्ली, मुंबई जिंकली; आता गाव जिंंका, ग्रामपंचायती पक्षाच्या चिन्हावर लढणार, सुभाष देशमुख यांची माहिती

दिल्ली, मुंबई जिंकली; आता गाव जिंंका, ग्रामपंचायती पक्षाच्या चिन्हावर लढणार, सुभाष देशमुख यांची माहिती

Next

दिल्ली, मुंबई जिंकली; आता गाव जिंंका, ग्रामपंचायती पक्षाच्या चिन्हावर लढणार, सुभाष देशमुख यांची माहिती
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २२ : दिल्ली जिंकली, मुंबई जिंकली, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भाजप सत्तेत आला, आता आपली ग्रामपंचायत जिंकण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले़
आगामी ग्रामपंचायत निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली़ सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले़
यावेळी बोलताना सहकारमंत्री देशमुख म्हणाले, परिवर्तनाच्या लढाईत जनतेने साथ दिल्याने केंद्रात, राज्यात आणि जिल्ह्यात भाजपला सत्ता मिळाली आहे़ विकासाच्या योजना गावात राबवण्यासाठी ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता असली पाहिजे़ निवडणुकांची तयारी आतापासून सुरू करा़
बैठकीला भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, पंचायत समितीचे उपसभापती संदीप टेळे, सदस्य एम़ डी़ कमळे, शशिकांत दुपारगुडे, प्रशांत कडते, हणमंत कुलकर्णी, जगन्नाथ गायकवाड, हणमंत पुजारी, यतीन शहा, सागर तेली, पंडितराज कोरे, डॉ़ चनगोंडा हविनाळे, प्रकाश सोनगे (सावकार), मल्लेशी कस्तुरे, गुरण्णा तेली, भीमाशंकर नरसगोंडे, सचिन चव्हाण, भैरू चव्हाण, धर्मा राठोड, रामचंद्र होनराव, लक्ष्मण पाटील, सिद्धाराम हेले, सुनील कळके, महादेव पाटील, मधुकर चिवरे, बनसिद्ध वडरे, अतुल गायकवाड, रावजी कापसे, संगप्पा केरके, मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, राजू काकडे, रवींद्र रोकडे, बलवान गोतसुर्वे, धीरज छपेकर, बाळासाहेब पाटील, चंद्रकांत कोठाणे, गणेश शेजाळ, नित्यानंद वारे, श्रीशैल माळी यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़
-------------------------
भाजप चिन्हावर लढणार
दक्षिण सोलापूर तालुक्यात २३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आॅक्टोबर महिन्यात होणार आहेत़ सरपंचांची निवड थेट मतदानातून होणार असल्याने या निवडणुका चिन्हावर लढण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला़ पक्षाचे धोरण अद्याप ठरले नाही़ तरीही तुम्ही कामाला लागा, असे सांगत पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढण्याचे संकेत सहकारमंत्री देशमुख यांनी दिले़
-------------------------
प्रभारींच्या नेमणुका
कोणत्याही स्थितीत ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता स्थापित करण्यासाठी ग्रामपंचायतनिहाय पक्षाचे प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त करण्यात आले़ अन्य गावातील भाजप कार्यकर्त्यांवरही जबाबदारी सोपवण्यात आली़ गावात जाऊन तेथील राजकीय स्थिती, पक्षाची ताकद, अन्य गटातटांची माहिती संकलित करून जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांकडे हे प्रभारी अहवाल सादर करतील़ उमेदवार निवडीपासून निवडणूक जिंकण्यापर्यंत व्यूहरचना करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे़
-------------------------
या आहेत २३ ग्रामपंचायती़़़
आहेरवाडी, होनमुर्गी, मंद्रुप, वांगी, बंकलगी, कंदलगाव, विंचूर, निंबर्गी, शंकरनगर, औज (मं़) गावडेवाडी, दोड्डी, कुसूर-खानापूर, शिरवळ (जै), कासेगाव, गंगेवाडी, रामपूर, दर्गनहळ्ळी, धोत्री, आचेगाव, तोगराळी, बसवनगर, वळसंग.

Web Title: Delhi, Mumbai won; Now the district will fight on the symbol of Gram Panchayat party, Subhash Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.