अधिकाºयांच्या वादात सोलापूर महानगरपालिकेचे अंदाजपत्रक लटकले, मुख्य लेखापाल अन् नगरसचिव यांच्यात टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 02:02 PM2019-02-23T14:02:38+5:302019-02-23T14:03:51+5:30

सोलापूर : महापालिकेचे २०१९-२० चे अंदाजपत्रक एक मार्च रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत घेण्याची तयारी महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह पदाधिकाºयांनी ...

Delivering the budget of Solapur Municipal Corporation, the Chief Accountant and the Municipal Secretary, tollwatolvi | अधिकाºयांच्या वादात सोलापूर महानगरपालिकेचे अंदाजपत्रक लटकले, मुख्य लेखापाल अन् नगरसचिव यांच्यात टोलवाटोलवी

अधिकाºयांच्या वादात सोलापूर महानगरपालिकेचे अंदाजपत्रक लटकले, मुख्य लेखापाल अन् नगरसचिव यांच्यात टोलवाटोलवी

Next
ठळक मुद्देमहापालिकेचे २०१९-२० चे अंदाजपत्रक एक मार्च रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत घेण्याची तयारी महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह पदाधिकाºयांनी केलीमुख्य लेखापाल आणि नगरसचिव यांच्यातील समन्वयाअभावी हे अंदाजपत्रक गेले चार दिवस सुटकेसमध्येच पडून

सोलापूर : महापालिकेचे २०१९-२० चे अंदाजपत्रक एक मार्च रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत घेण्याची तयारी महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह पदाधिकाºयांनी केली आहे. मात्र मुख्य लेखापाल आणि नगरसचिव यांच्यातील समन्वयाअभावी हे अंदाजपत्रक गेले चार दिवस सुटकेसमध्येच पडून आहे. 

महापालिकेचे अंदाजपत्रक दरवर्षी ३१ मार्चअखेर मंजूर केले जाते. मनपा प्रशासनाने तयार केलेले अंदाजपत्रक प्रथम स्थायी समितीमध्ये पाठविले जाते. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर ते चर्चेसाठी सभागृहात येते. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात स्थायी समिती सभापतीपदावरुन वाद झाला. स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने अंदाजपत्रक थेट सभागृहाकडे पाठवावे लागले. त्याला जून महिना उजाडला. मार्च महिन्यात मंजूर होणारे अंदाजपत्रक जून महिन्यात मंजूर झाल्याने सत्ताधारी भाजपा पदाधिकाºयांवर टीका झाली होती.

यंदा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी अंदाजपत्रक मंजूर व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महापौर शोभा बनशेट्टी आणि सभागृह नेते संजय कोळी सांगत आहेत. 
दरवर्षी २० फेब्रुवारीपर्यंत महापालिका प्रशासन अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर करते. यंदाही मुख्य लेखापाल शिरीष धनवे यांनी अंदाजपत्रक तयार केले. यादरम्यान, महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली झाली. प्रभारी आयुक्तांच्या सहीने १८ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला पाठविण्यासाठी नगरसचिव कार्यालयात सादर केले.

नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी या अंदाजपत्रकाची प्रत स्वीकारली. त्यानंतर त्यांनी स्थायी समिती अस्तिवात नसल्याचे पत्र मुख्य लेखापाल कार्यालयाला पाठविले आहे. या पत्रानंतर मुख्य लेखापाल यांनी हे अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेत सादर करणे अपेक्षित असल्याचे नगरसचिव कार्यालयाचे म्हणणे आहे. पण जोपर्यंत नगरसचिव अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेत सादर करा, असे लेखी पत्र देत नाहीत, तोपर्यंत आम्ही ते सर्वसाधारण सभेकडे कसे द्यायचे, असा सवाल लेखापाल धनवे यांनी उपस्थित केला आहे. या वादात गेलेले अंदाजपत्रक सुटकेसमध्ये पडून आहे. 

अधिकाºयांनी चर्चा करायला हवी होती..
- एक मार्चला महापालिकेची सर्वसाधारण सभा आहे. त्यात अंदाजपत्रक मंजूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अंदाजपत्रक लवकर सादर करा, असे पत्र नगरसचिव आणि मुख्य लेखापाल यांना दिले आहे. अधिकाºयांना काही अडचण आली तर त्यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती. दोघेही महापालिकेचे प्रमुख अधिकारी आहेत. अशा प्रकारची टोलवाटोलवी त्यांनी करायला नको आहे. उद्या दोघांनाही बोलावून अंदाजपत्रकाचा विषय मार्गी लावू, असे महापौर शोभा बनशेट्टी यांनी यावेळी सांगितले.

मुख्य लेखापाल यांनी स्थायी समितीसाठी अंदाजपत्रक पाठविले आहे. पण सध्या स्थायी समिती सभापतीपदाचा वाद सर्वाेच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याबाबत मुख्य लेखापाल यांना अवगत केले आहे. 
- प्रवीण दंतकाळे, 
नगरसचिव, महापालिका. 

स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेकडे सादर करा, असे नगरसचिवांनी सांगायला हवे. तसे थेट पत्र द्यायला हवे. तरच हे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत येईल. 
- शिरीष धनवे, 
मुख्य लेखापाल. 

Web Title: Delivering the budget of Solapur Municipal Corporation, the Chief Accountant and the Municipal Secretary, tollwatolvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.