बिबट्याच्या शोधासाठी २० ड्रोन व ५ शार्पशूटरची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:17 AM2020-12-09T04:17:36+5:302020-12-09T04:17:36+5:30

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बिबट्याने हल्ले करून तिघांचा बळी घेतलेला आहे. या नरभक्षक बिबट्याने शेतकऱ्यांच्या गाई, म्हैशी, ...

Demand for 20 drones and 5 sharpshooters to search for leopards | बिबट्याच्या शोधासाठी २० ड्रोन व ५ शार्पशूटरची मागणी

बिबट्याच्या शोधासाठी २० ड्रोन व ५ शार्पशूटरची मागणी

Next

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बिबट्याने हल्ले करून तिघांचा बळी घेतलेला आहे. या नरभक्षक बिबट्याने शेतकऱ्यांच्या गाई, म्हैशी, शेळ्या, बैल आदी पाळीव प्राण्यांवर हल्ले करून ठार केले आहे. करमाळा तालुक्याची भौगोलिक व बागायती स्थिती पाहता ऊस, केळी व इतर फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे बिबट्याचा शोध घेणे अवघड आहे.

या भागात बिबट्यांची संख्याही अधिक प्रमाणात असल्याने त्यांचा शोध घेण्यास वनविभाग, महसूल व पोलीस प्रशासनाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या विभागांची गैरसोय टाळण्यासाठी व बिबट्यांचा शोध घेण्यासाठी करमाळा तालुक्यामध्ये २० ड्रोन कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे. शिवाय एकच शार्पशूटर शासनाने दिला आहे. आणखी ५ शार्पशूटर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

----

करमाळा तालुक्यात यापूर्वी बिबट्याने माणसे मारल्याचे कधी घडले नाही. मात्र ६ दिवसात ३ जणांचा बळी या बिबट्याने घेतला आहे. विशेष म्हणजे दोघांचे तर मुडकेच धडा वेगळे केले आहे. सोमवारी चिखलठाण भागात वन विभागाला तीन वेळा बिबट्या दिसला मात्र त्याला वन विभागाला मारता आले नाही. शासनाने आधुनिक सुविधा पुरवणे गरजेचे आहे.

- नारायण पाटील, माजी आमदार. करमाळा

Web Title: Demand for 20 drones and 5 sharpshooters to search for leopards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.