बशीर जहागीरदार यांची चौकशी करून कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:24 AM2021-04-23T04:24:05+5:302021-04-23T04:24:05+5:30
टेंभुर्णीतील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी संयुक्त पत्रकार घेऊन याबद्दल माहिती दिली. यावेळी रिपाइं आठवले ...
टेंभुर्णीतील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी संयुक्त पत्रकार घेऊन याबद्दल माहिती दिली. यावेळी रिपाइं आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर खरात, शहराध्यक्ष रमेश लोंढे, युवा सेनेचे शहराध्यक्ष कुलदीप पाटील, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष मयूर काळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे जिल्हा अध्यक्ष जयवंत पोळ, मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे, अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार धोत्रे, दलित स्वयंसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप उपस्थित होते. भाजपचे शहराध्यक्ष गिरीश ताबे, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भिडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.
वरील सर्व राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या निवेदन देऊन आरटीआय कार्यकर्ता जागीरदार यांची पोलीस यंत्रणेद्वारे चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या मागणीचे निवेदन सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना दिले.
परमेश्वर खरात म्हणाले, जागीरदार हे सामाजिक कार्याचा बुरखा पांघरून माहिती अधिकाराचा गैरवापर करून अधिकारी व पदाधिकारी यांना त्रास देत होते. त्यांच्यामध्ये भीती निर्माण करत होते. तसेच सामाजिक कार्याच्या नावाखाली ते अनेकांना वैयक्तिक लक्ष्य करून त्रास देत आहेत. त्यांची चौकशी करून कारवाई करावी हीच आम्हा सर्व राजकीय व सामाजिक संघटनांची मागणी आहे. तसेच या सर्व संघटना व बशीर जागीरदार यांचा कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
फोटो
२२टेंभुर्णी-निवेदन
ओळी
बशीर जागीरदार यांच्या चौकशीचे निवेदन पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना देताना राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी.