संजयमामाच्या गावात का केली फेर मतदानाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 03:05 PM2019-04-23T15:05:05+5:302019-04-23T15:11:29+5:30

काय म्‍हणाले, रणजितसिंह- नाईक  - निंबाळकर

Demand for casting vote in Sanjayama's village | संजयमामाच्या गावात का केली फेर मतदानाची मागणी

संजयमामाच्या गावात का केली फेर मतदानाची मागणी

Next
ठळक मुद्देमाढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या निमगाव या गावी आज सकाळी मतदान प्रक्रिया चालूभाजपाचे उमेदवार नाईक-  निंबाळकर यांच्या मतदान प्रतिनिधींना मतदान केंद्र अधिकाºयांनी दोन वेळा हाकलून देऊन तेथे थांबू दिले नाही.

टेंभुर्णी : आघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या निमगाव (टें) या गावी दमदाटी करून भाजप उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींना हाकलून दिल्याच्या घटनेचा गांभीर्याने दखल घेऊन निमगाव येथील मतदान प्रक्रिया रद्द करून फेरनिवडणूक घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याची माहिती महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी टेंभुर्णी येथे पत्रकारांना दिली.

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या निमगाव या गावी आज सकाळी मतदान प्रक्रिया चालू असताना भाजपाचे उमेदवार नाईक-  निंबाळकर यांच्या मतदान प्रतिनिधींना मतदान केंद्र अधिकाºयांनी दोन वेळा हाकलून देऊन तेथे थांबू दिले नाही. संजय शिंदे यांचे समर्थक येथे दादागिरी करून मतदान करून घेत आहेत. हा सर्व प्रकार तेथे उपस्थित असलेल्या शासकीय  कर्मचाºयांच्या साक्षीने होता असून ही गंभीर बाब असल्याने आम्ही या ठिकाणची निवडणूक रद्द करून फेर मतदान घेण्याची मागणी आमचे प्रतिनिधी धैर्यशील मोहिते - पाटील यांच्यामार्फत करणार असल्याचे नाईक - निंबाळकर म्हणाले.

नाईक - निंबाळकर यांचे प्रतिनिधी धैर्यशील मोहिते पाटील यावेळी म्हणाले की, आम्ही सकाळी निमगाव येथे गेलो असता त्याठिकाणी आमचे मतदान प्रतिनिधी आढळून आले नाहीत़ अधिक माहिती घेतल्यानंतर समजले की, आमच्या प्रतिनिधींना संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यानी दमदाटी करून तेथून हाकलून दिले आहे़ प्रतिनिधींना तुम्हाला येथे बसता येणार नाही असे सांगितले. याबाबत मी तहसीलदार व वरिष्ठ अधिकाºयांकडे चौकशी केली असता त्यांना थांबण्यास काही हरकत नसल्याचे सांगितले़ निमगांव येथे उपस्थित अधिकाºयांच्या साक्षीने आमच्या प्रतिनिधीस दमदाटी केली जात असताना त्यांनी कुठलाही हस्तक्षेप केला नाही़ याबाबात टेंभुर्णी पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार केली आहे.

आज सकाळी निमगाव येथे मतदान प्रक्रिया चालू झाल्यानंतर प्रहारचे अतुल खुपसे हे भाजपचे उमेदवार नाईक - निंबाळकर यांचे मतदान प्रतिनिधी घेऊन गेले असता त्यांनाही तुझे येथे काय काम आहे असे म्हणून हाकलून देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी अतुल खुपसे यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना घडल्या प्रकारांची माहिती दिली. माहिती मिळताच  मोहिते - पाटील निमगाव येथे दाखल झाले. यावेळी तेथे  मतदान प्रतिनिधी आढळून आले नाहीत़ कैलास गोरख आलदार रा. बादलेवाडी  या मतदान प्रतिनिधीने टेंभुर्णी पोलिस स्टेशनमध्ये येऊन मतदान केंद्राधिकारी व संजय शिंदे यांचे मतदान प्रतिनिधी यांच्याविरध्द तक्रार दिली आहे.

Web Title: Demand for casting vote in Sanjayama's village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.