कुर्डूवाडी आगारातील कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:22 AM2021-04-04T04:22:19+5:302021-04-04T04:22:19+5:30
कुर्डूवाडी : येथील आगारातील ३०६ कर्मचाऱ्यांना कोरोना लस उपलब्ध करून देण्याची मागणी आगारप्रमुखांनी आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे. कुर्डूवाडी ...
कुर्डूवाडी : येथील आगारातील ३०६ कर्मचाऱ्यांना कोरोना लस उपलब्ध करून देण्याची मागणी आगारप्रमुखांनी आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
कुर्डूवाडी एसटी आगारातील कर्मचारी, अधिकारी अत्यावश्यक सेवामध्ये काम करतात. वयाची अट न घालता शासनाने कर्मचाऱ्यांना कोरोना लस त्वरित उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कुर्डूवाडी एसटी आगाराचे प्रमुख एम. डी. राठोड यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कुर्डूवाडी एसटी बस आगारातील चालक, वाहक हे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये ही आपली सेवा देत आहेत. त्यांच्या आरोग्याचा विचार करता या सर्व कर्मचाऱ्यांना लस देण्याची गरज आहे. येथील आगारामध्ये चालक, वाहक, मेकॅनिकल व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी मिळून ३०६ कर्मचारी काम करतात. कुर्डूवाडी शहरातील ग्रामीण रुग्णालयातून शासकीय कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक अशा एकूण ३ हजार ७९० जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. आगारातील कर्मचारी व अधिकारी यांना लस द्यावी. सध्या माढा तालुक्यात कोविड लसीकरणाची एकूण नऊ केंद्रे आहेत. माढा, कुर्डूवाडी, मोडनिंब, टेंभुर्णी, पिंपळनेर, उपळाई बुद्रुक, परिते, आलेगाव, मानेगाव अशी केंद्रे आहेत. १ एप्रिलपर्यंत १० हजार ९२५ जणांना लस दिली आहे.