माढ्यात महिला कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:20 AM2021-01-04T04:20:04+5:302021-01-04T04:20:04+5:30
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील महिला कर्मचाऱ्यांना व महिला शिक्षकांना ग्रामपंचायत मतदान प्रक्रियेतून वगळण्यात ...
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील महिला कर्मचाऱ्यांना व महिला शिक्षकांना ग्रामपंचायत मतदान प्रक्रियेतून वगळण्यात यावे यासाठी महिला आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष चंदाराणी आतकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार राजेश चव्हाण यांना लेखी निवेदन दिले.
यावेळी माढा तालुका अध्यक्ष स्मिता कुंभार, चिटणीस चंद्रकला नागणे उपस्थित होते. माढा तालुका सोडून इतर तालुक्यांत महिला कर्मचाऱ्यांना व महिला शिक्षकांना निवडणूक कामाची जबाबदारी नाही. त्यातच महिलांचा संक्रात सणही आलेला आहे. त्यामुळे याबाबत विचार करावा. यावर तहसीलदार राजेश चव्हाण यांनी निवेदन स्वीकारून याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
--
फोटो- ०३ लऊळ
महिला कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळावे म्हणून तहसीलदार चव्हाण यांना निवेदन देताना चंदाराणी आतकर, स्मिता कुंभार, चंद्रकला नागणे.