मच्छीमार बांधवांना अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:23 AM2021-05-20T04:23:23+5:302021-05-20T04:23:23+5:30

सोलापूर जिल्ह्यात अनेक नोंदणीकृत सोसायटी संस्था, तसेच क्रियाशील मच्छीमार व असंघटित मच्छीमार अशी एकूण २५ हजार मच्छीमार कुटुंबे अवलंबून ...

Demand for grants to fishermen | मच्छीमार बांधवांना अनुदान देण्याची मागणी

मच्छीमार बांधवांना अनुदान देण्याची मागणी

Next

सोलापूर जिल्ह्यात अनेक नोंदणीकृत सोसायटी संस्था, तसेच क्रियाशील मच्छीमार व असंघटित मच्छीमार अशी एकूण २५ हजार मच्छीमार कुटुंबे अवलंबून आहेत. मासेमारी व विक्री बंद असल्याने अनेक मच्छीमार बांधवांना रोजीरोटीचा प्रश्न सतावत आहे. शासनाने दखल घेऊन आर्थिक अथवा शिधा अनुदान द्यावे.

शासनाकडून अत्यावश्यक सेवा सोडून लॉकडाऊन वाढविल्यामुळे ७ ते ११ यावेळेत मासे पकडून विक्री करणे शक्य नाही. सोलापूर शहर व जिल्ह्यातील हातावर पोट असणाऱ्या मच्छीमारांचा विचार करून त्यांच्या रोजीरोटीची अडचण होऊ नये, म्हणून कोरोनाचे नियम पाळून योग्य खबरदारी घेऊन पूर्ण वेळ मासेमारी व मासे विक्री करण्यास परवानगी देण्यात यावी. शासनाने रेशन धान्य व मच्छीमार बांधवांना सानुग्रह अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

----

Characters : 0

Web Title: Demand for grants to fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.