हॉस्पिटल व प्रशासनाच्या मनमानीची चौकशी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:23 AM2021-05-21T04:23:13+5:302021-05-21T04:23:13+5:30

माळशिरस : तालुक्यातील खासगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराबाबत आरोग्य व महसूल प्रशासनाच्या कारभाराची शासकीय चौकशी करण्यासाठी पंचायत समितीचे ...

Demand for an inquiry into the arbitrariness of the hospital and the administration | हॉस्पिटल व प्रशासनाच्या मनमानीची चौकशी करण्याची मागणी

हॉस्पिटल व प्रशासनाच्या मनमानीची चौकशी करण्याची मागणी

googlenewsNext

माळशिरस : तालुक्यातील खासगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराबाबत आरोग्य व महसूल प्रशासनाच्या कारभाराची शासकीय चौकशी करण्यासाठी पंचायत समितीचे सदस्य व विरोधी पक्षनेते अजय सकट यांनी प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रांत, तहसील व आरोग्य प्रशासन सर्वसामान्यांची दखल घेत नसल्याचा आरोप होत आहे. हेल्पलाईन सुरू केले मात्र; हॉस्पिटल, बेड उपलब्ध होत नाही. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण करून काळा बाजार केला जात आहे. प्रशासनातील दोषी अधिकारी व डॉक्टरांवर तत्काळ कारवाई करावी. हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे बिल आकारणी होत नाही. प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून नायब तहसीलदार यु. आर. देसाई व वरिष्ठ लिपिक कारंडे यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे, माजी उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे, जब्बार मुलाणी, रवी वाघमारे यांनी पाठिंबा दिला.

---

फोटो : १९ माळशिरस

एकदिवसीय लाक्षणिक उपोषणानंतर मागणीचे निवेदन देताना.

Web Title: Demand for an inquiry into the arbitrariness of the hospital and the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.