आळजापूर ग्रामपंचायतमधील बेकायदा कामकाजाच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:23 AM2021-09-18T04:23:54+5:302021-09-18T04:23:54+5:30
खरात यांनी बेकायदा कामाचं पुरावे सादर केले असून, यामध्ये गैरहजर ग्रामपंचायत सदस्य मासिक सभेत हजर दाखवले, असल्याचा आरोप केला ...
खरात यांनी बेकायदा कामाचं पुरावे सादर केले असून, यामध्ये गैरहजर ग्रामपंचायत सदस्य मासिक सभेत हजर दाखवले, असल्याचा आरोप केला आहे. खरात यांनी म्हटले आहे, की, ग्रामपंचायतीची २३ मार्चला मासिक बैठक झाली. या बैठकीमध्ये ठराव क्रमांक ४/१ एकमध्ये गैरहजर असलेले ग्रामपंचायत सदस्य वैशाली केवारे यांना सूचक म्हणून दाखवले आहे. या बैठकीला सरपंच मनीषा घोडके, उपसरपंच नितीन गपाट, सीताराम गायकवाड व केवारे हे सदस्य गैरहजर होते. याचा ग्रामसेवकांनी रजिस्टरला शेराही मारला आहे. असे असताना त्याच दिवशी झालेल्या बैठकीमध्ये केवरे यांना ठरावामध्ये सूचक म्हणून दाखवण्यात आले आहे.
आळजापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच ॲड. नितीन गपाट म्हणाले, २३ मार्चला झालेल्या ग्रामसभेला मी गैरहजर होतो. चुकीच्या कामाचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही, असे म्हटले आहे. दरम्यान गटविकास अधिकारी राऊत यांनी तक्रार पाहून पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले.
----