लूटमार करणाऱ्या दूध संस्थांच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:15 AM2021-06-19T04:15:49+5:302021-06-19T04:15:49+5:30
लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत, खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर १० ते १५ रुपये प्रतिलीटरने ...
लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत, खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर १० ते १५ रुपये प्रतिलीटरने पाडले. मात्र, ग्राहकांसाठीचे विक्रीचे दर तसेच ठेवत शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लुटमार केली आहे. लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचा बाऊ करून, ज्या खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर पाडले. त्या सर्व दूध संघाचे ऑडिट करून प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली व किती दर कमी दिला आहे, याबाबत सखोल चौकशी करा व परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या खासगी व सहकारी दूध संघावर कठोर कारवाई करा, केलेली लूटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करा, अशी मागणी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.