ग्रामीण भागातील दुकाने खुली करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:16 AM2021-06-05T04:16:36+5:302021-06-05T04:16:36+5:30
दुकाने चालू ठेवण्याबाबत मागणीचे निवेदन हरवाळकर यांनी तहसीलदार अंजली मरोड यांना दिले. दुचाकीवरून बी, बियाणे नेणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीस दंडाची ...
दुकाने चालू ठेवण्याबाबत मागणीचे निवेदन हरवाळकर यांनी तहसीलदार अंजली मरोड यांना दिले. दुचाकीवरून बी, बियाणे नेणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीस दंडाची कारवाई करीत आहेत. सध्या पेरणीचे दिवस आहेत. दुचाकीस्वार शेतकऱ्यांवर कारवाई करू नये. कोरोनाने मृत रुग्णांवर अक्कलकोट येथील डॉ. ए पी जे अब्दुल कलाम फाैंडेशन मोफत अंतिम संस्कार करीत आहे. त्यांना फ्रंटलाईन कोरोनो योद्धा म्हणून सन्मानित करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. १० जूनपर्यंत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
यावेळी अस्लम बागवान, अमीर बागवान, महंमद दावणा, मुजमील अन्सारी, ताजुद्दीन शिकलगार, रमेश शिंदे, राजाक पटेल आदी शेतकरी उपस्थित होते.
---
फोटो : ०४ अक्कलकोट
ग्रामीण भागातील दुकाने सुरू करण्यासाठी तहसीलदार अंजली मरोड यांना निवेदन देताना स्वामीनाथ हरवाळकर, अमीर बागवान.