वाँर्डनिहाय लसीकरणासाठी जागा उपलब्थ करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:23 AM2021-04-28T04:23:42+5:302021-04-28T04:23:42+5:30
करमाळा : लसीकरण मोहिमेत गर्दीमुळे संसर्ग होऊ नये यासाठी शासनाने वॉर्डनिहाय कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करावेत व स्थानिक ...
करमाळा : लसीकरण मोहिमेत गर्दीमुळे संसर्ग होऊ नये यासाठी शासनाने वॉर्डनिहाय कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करावेत व स्थानिक नगरपरिषद, बाजार समिती व शिक्षण संस्थांनी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केली आहे.
शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर लसीकरणाची मोहीम राबविण्याचे ठरविले आहे . सद्य:स्थितीत लसीकरण हेच प्रभावी माध्यम ठरले आहे. शासनाच्या आरोग्य विभागाकडून १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वच नागरिकांना लसीकरण करण्याचे नियोजन आहे; परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविताना उपजिल्हा रुणालय अथवा शासकीय आरोग्य केंद्रांवर गर्दी होणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोकादेखील आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतर वॉर्डनिहाय कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र उभा करून मोहीम हाती घेण्यात यावी. यासाठी आवश्यक ती मदत व सहाय्य करत असल्याचा प्रस्ताव तहसीलदार यांच्यामार्फत शासनाकडे सादर करावेत, अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले आहे.