दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:23 AM2021-05-11T04:23:03+5:302021-05-11T04:23:03+5:30
दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारी दहावीची परीक्षा राज्य सरकारने कोरोना महामारीमुळे रद्द करण्याचा निर्णय घेतला. या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या साहाय्याने उत्तीर्ण ...
दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारी दहावीची परीक्षा राज्य सरकारने कोरोना महामारीमुळे रद्द करण्याचा निर्णय घेतला. या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या साहाय्याने उत्तीर्ण करण्याचे जाहीर केले. यामुळे यंदा दहावीच्या लेखी परीक्षा होणार नसल्याने पर्यवेक्षकांचे मानधन, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अतिरिक्त परीक्षेचे साहित्य, भरारी पथकाचा खर्च, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका छपाईसाठी लागणारा खर्च राज्य शिक्षण मंडळाला भरावा लागणार नाही. यामुळे दहावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून घेतलेली परीक्षा फी परत करा अशी मागणी विद्यार्थी, पालक करीत आहेत.
कोट :::::::::::::::::::
राज्य शिक्षण मंडळाने यावर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांना ४१५ रुपये, तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना ३९५ रुपये परीक्षा शुल्क भरावे लागले होते. यामध्ये सांगोला तालुक्यातून सुमारे २३ ते २४ लाख रुपयांचे शुल्क मंडळाकडे जमा झाले आहे. दुष्काळ, इतर नैसर्गिक संकटे निर्माण झालेल्या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून शासनाकडून परीक्षा शुल्क माफी मिळते. कोरोना संसर्गामुळे दहावीची परीक्षाच रद्द झाल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा फी शासनाने लवकर परत द्यावी.
- कमरुद्दीन खतीब
शिवसेना शहरप्रमुख