भोत्रे बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:22 AM2021-03-18T04:22:14+5:302021-03-18T04:22:14+5:30
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात कुकडी व कोळगाव पाणीवाटप समिती मीटिंगच्या अनुषंगाने कोळगाव धरणावरील भोत्रे बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी ...
जलसंपदामंत्री जयंत पाटील
यांच्या दालनात कुकडी व कोळगाव पाणीवाटप समिती मीटिंगच्या
अनुषंगाने कोळगाव धरणावरील भोत्रे बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी त्यांनी केली. नियोजन मीटिंगमध्ये जयंत पाटील यांनी पाणी सोडण्याविषयी संबंधित विभागाला फोनद्वारे सूचना केली. या पाण्याचा फायदा करमाळा तालुक्यातील नेरले व आवटी, तसेच माढा तालुक्यातील लोणी व मुंगशी, परंडा तालुक्यातील परांडा व भोत्रे या गावांना होणार आहे.
यावेळी मंत्री दिलीप वळसे-पाटील, आ. रोहित पवार, आ. संजयमामा शिंदे,
व आमदार अतुल बेनके यावेळी उपस्थित होते.
फोटो : १७ करमाळा-निवेदन
कुकडी पाणी वाटप नियोजन समितीच्या बैठकीत जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, आ.रोहित पवार, संजयमामा शिंदे, अतुल बेनके.