पंचकट्ट्याच्या दुरुस्तीची मागणी; ओपन जीम हलवा खंदक बागेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:23 AM2020-12-06T04:23:58+5:302020-12-06T04:23:58+5:30
इन्फो बॉक्स पुढील आठवड्यात भूमिका ठरेल- धर्मराज काडादी यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान पंच कमिटीची डिसेंबरच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात बैठक ...
इन्फो बॉक्स
पुढील आठवड्यात भूमिका ठरेल- धर्मराज काडादी
यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान पंच कमिटीची डिसेंबरच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात बैठक होत असते. आता डिसेंबरचा पहिला सप्ताह संपत आला आहे. पुढील आठवड्यात पंच कमिटीची बैठक बोलावण्यात येणार आहे. या बैठकीत पंच कमिटीची भूमिका ठरणार आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन करूनच यात्रा पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सांगितले.
ओपन जीमचा भाविकांंना त्रास-भोगडे
लक्ष्मी मंडई ते पठाण बाग मार्गावर अण्ण बोमय्याचे मंदिर आहे. या मंदिराजवळ स्मार्ट सिटी अंतर्गत ओपन जीम सुरू करण्यात आली आहे. या ओपन जीमला पंच कमिटीने हरकत घेतली आहे.
भुईकोट किल्ल्यातील खंदक बागेत या ओपन जीमला पंच कमिटीने पर्यायी जागा सुचवली आहे. पहाटेपासून या मार्गावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. विशेषत: महिला भाविकांना या ओपन जीमचा त्रास होणार नाही, याचा विचार करून पंच कमिटीने मनपा आयुक्तांसह संबंधितांना पत्र देण्यात आल्याचे सदस्य बाळासाहेब भोगडे यांनी सांगितले.
ॲमेझिंग पार्कचे शिष्टमंडळ येणार
यात्रेनिमित्त होम मैदानावर ॲमेझिंग पार्क उभे केले जाते. जवळपास दीडशेहून अधिक मनोरंजनाचे स्टॉल्स या पार्कमध्ये असतात. देशभरात यात्रेस परवानग्या देण्यात आल्या आहेत. नऊ-साडेनऊशे वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेत खंड पडता कामा नये, असा सूर ॲमेझिंग पार्कमधील स्टॉलधारकांमधून ऐकावयास मिळत आहे. पुढील आठवड्यात पार्कचे काही संचालक सोलापुरात येणार आहेत. मनपा आयुक्त, पोलीस आयुक्तांना भेटून पार्क उभारण्यास परवानगीची मागणी करणार असल्याचे संचालक हरीशभाई पटेल यांनी सांगितले.
कोट
आजपर्यंत यात्रेत एकदाही खंड पडला नाही. कोरोनाच्या काळातही साधेपणाने का होईना यात्रा झाली पाहिजे. नियम आणि अटींचे पालन करून यात्रेतील धार्मिक विधींना परवानगी द्यायला हरकत नाही. यंदाच्या यात्रेत भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणणेही गरजेचे आहे.
-राज पाटील,
युवक अध्यक्ष- महाराष्ट्र वीरशैव सभा.