शिवजयंतीत लादलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:21 AM2021-02-14T04:21:36+5:302021-02-14T04:21:36+5:30
करमाळा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव साजरी करत असताना शासनाने जाचक अटी लादले आहेत. त्या त्वरित रद्द ...
करमाळा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव साजरी करत असताना शासनाने जाचक अटी लादले आहेत. त्या त्वरित रद्द करून शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्याची मागणी करमाळा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.
महाराष्ट्र शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणेसाठी १९ फेब्रुवारी रोजी होणारी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरी करण्याबाबत परिपत्रक काढले आहे. अनेक प्रकारचे जाचक अटी व निर्बंध लावलेल्या आहेत. परंतू आता राज्यात कोरोनाचे प्रमाण अत्यल्प आहे. महाराष्ट्र शासनाने अनेक बाबतीत शाळा, रेल्वे, एसटी बस, हाॅटेल व्यवसाय सुरू करण्यास यापूर्वी परवानगी दिली आहे. तसेच निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शासनाने सर्व शिवप्रेमीच्या भावना लक्षात घेता महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव साजरी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ज्या जाचक अटी लावलेल्या आहेत त्या त्वरित रद्द करून परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.