महाळुंग येथील यमाई मंदिराची दुरुस्तीसाठी एक कोटींच्या निधीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:27 AM2021-09-17T04:27:42+5:302021-09-17T04:27:42+5:30
यावर आमदार बबनदादा शिंदे यांनी केंद्रीय मंत्री श्री रेड्डी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाळुंग येथे यमाईदेवीचे प्राचीन ...
यावर आमदार बबनदादा शिंदे यांनी केंद्रीय मंत्री श्री रेड्डी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाळुंग येथे यमाईदेवीचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात अनेक ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी येत असतात. या मंदिराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. मंदिराच्या समोरील प्राचीन बारव पाच वर्षांपासून पडलेली आहे. बारवाजवळील एक दीपमाळ ही धोकादायक बनली आहे. या मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता बंद आहे. त्यामुळे या मंदिराची दुरुस्तीची गरज आहे.
केंद्रशासनाच्या परवानगीशिवाय मंदिर दुरुस्तीचे काम करता येत नाही. या मंदिराच्या दुरुस्तीसाठी केंद्र शासनाकडे १ कोटीच्या निधीची मागणी केली असून खासदार शरद पवार, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने हा निधी लवकरच मंजूर करू, अशी ग्वाही आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली.
----
यमाई देवी मंदिराची प्रस्तावित कामे
या मंदिरातील बारव व दीपमाला दुरुस्ती करणे तसेच नवीन भक्तनिवास बांधकाम करणे, मंदिराभोवती दगडी फरशी बसवणे, मंदिराभोवती मंडप बांधणे, मंदिर परिसरात बसण्याची व्यवस्था करणे, गोंदेश्वर मंदिर भवती मंडप बांधणे तसेच श्री यमाई मंदिर प्रवेशद्वार व रस्ते बांधकाम करणे तसेच परिसरातील इतर दुरुस्त्या करण्यासाठी निधीची मागणी केली आहे.
----