गादेगाव येथे कोविड सेंटर उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:17 AM2021-04-29T04:17:37+5:302021-04-29T04:17:37+5:30
मागील काही दिवसांपासून चाचण्यांचे जसजसे प्रमाण वाढत आहे तसतशी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. रुग्ण पॉझिटिव्ह झाल्यानंतर तालुकास्तरावरील विलगीकरण ...
मागील काही दिवसांपासून चाचण्यांचे जसजसे प्रमाण वाढत आहे तसतशी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. रुग्ण पॉझिटिव्ह झाल्यानंतर तालुकास्तरावरील विलगीकरण कक्षात ठेवण्याची सोय आहे. ज्यांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची गरज आहे, अशा रूग्णांना मोठ-मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावे लागते. सध्या सर्वच विलगीकरण कक्ष, मोठी हॉस्पिटल फुल्ल आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना बेड मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर गादेगावमध्ये कोविड सेंटर उभारल्यास गादेगावसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची येथे सोय होणार आहे. याठिकाणी कोविड सेंटर उभारल्यास त्याची जबाबदारी ग्रामस्थ घेण्यास तयार आहेत. त्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे किंवा तसे मार्गदर्शन करावे, अशी मागणी दत्ता बागल, गणेश बागल, गणपत मोरे, विकास बागल, अजिनाथ बागल यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.