सोयाबीनचं डिमांड वाढतेय.. ६२ हजार हेक्टरवर पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:16 AM2021-07-15T04:16:47+5:302021-07-15T04:16:47+5:30
पावसाळ्याच्या सुरुवातीपासून पावसाने साथ दिल्याने जून महिन्यात मोठ्या प्रमाणात खरीप पिकाची पेरणी झाली. खरीप पिकामध्ये प्रामुख्याने तूर, उडीद, मूग, ...
पावसाळ्याच्या सुरुवातीपासून पावसाने साथ दिल्याने जून महिन्यात मोठ्या प्रमाणात खरीप पिकाची पेरणी झाली. खरीप पिकामध्ये प्रामुख्याने तूर, उडीद, मूग, सूर्यफूल, भुईमूग, सोयाबीन, आदी प्रकारच्या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरीप पिकाची पेरणी केली. त्यानंतर तब्बल बारा दिवस पाऊस झाल्याने पिके सुकू लागली होती. यामुळे दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर तालुक्यात सर्वत्र पाऊस बरसल्याने खरीप पिकांची चिंता मिटली आहे.
------
९५ टक्के पेरणी
५२०० हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. त्यात विशेषतः वागदरी, घोळसगाव, किरनळ्ळी, चुंगी, किणी, किणीवाडी, हन्नूर, खैराट, गोगाव, भुरीकवटे या भागात सर्वाधिक सोयाबीन पेरणी झाली आहे. एकंदरीत तूर, उडीद, मूग, सूर्यफूल, सोयाबीन आदी पिकांची तब्बल ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
---
तालुक्यात यंदाही समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप पिके मोठ्या दिमाखात डोलत आहेत. पिके सध्या खुरपणी, कोळपणीला आली आहेत. शेतकऱ्यांनी जमीन तणविरहित स्वच्छ ठेवण्याचे काम करावे. यामुळे रोगराई होणार नाही.
- सूर्यकांत वडखेलकर, तालुका कृषी अधिकारी
----
१४अक्कलकोट
खैराट (ता. अक्कलकोट) येथील सुरेश तोळणुरे यांच्या शेतात उडीद पिकाची कोळपणी झाल्याचे दिसत आहे.