सोलापूर-पुणे रेल्वे पॅसेंजर सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:23 AM2021-02-16T04:23:38+5:302021-02-16T04:23:38+5:30
लॉकडाऊननंतर जवळजवळ दहा महिन्यांच्या कालावधीनंतर रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे गाड्यांच्या नावाखाली जवळजवळ ८० टक्के रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. त्यामध्ये ...
लॉकडाऊननंतर जवळजवळ दहा महिन्यांच्या कालावधीनंतर रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे गाड्यांच्या नावाखाली जवळजवळ ८० टक्के रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. त्यामध्ये गरीब व सर्वसामान्य प्रवाशांच्या गाड्या मात्र अद्यापपर्यंत तरी बंदच ठेवल्या आहेत.
कोरोना महामारीनंतर हळूहळू सर्व काही व्यवस्थित सुरू होत असताना रेल्वे गाड्या बंद का, असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. सोलापुर-पुणे व पुणे-सोलापूर डेमो पॅसेंजर गरिबांचा रथ म्हणून ओळखली जाते. सोलापूर ते पुणे व पुणे ते सोलापूर रेल्वे पॅसेंजर गाडी सुरू केल्यास करमाळा, परांडा, जामखेड, कर्जत तालुक्यातील सामान्य लोकांना पुणे, दौंड, उरुळी कांचन, केडगाव, पाटस, भिगवणसह छोट्या गावाच्या ठिकाणी आपल्या उपजीविकेसाठी जावे लागते. तरी प्रवास करण्यासाठी अद्याप रेल्वेची सुविधा उपलब्ध झालेली नाही. तरी ती पॅसेंजर सुरू करण्याची मागणी होत आहे.