कोरोनावर उपचारासाठी उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:20 AM2021-04-13T04:20:52+5:302021-04-13T04:20:52+5:30
मोहोळ शहरासह तालुक्यात वाढती रुग्णसंख्या पाहता कडक उपाययोजना राबविण्यासाठी मतदारसंघाचे आ. यशवंत माने यांनी पंचायत समितीच्या सभागृहात तातडीची बैठक ...
मोहोळ शहरासह तालुक्यात वाढती रुग्णसंख्या पाहता कडक उपाययोजना राबविण्यासाठी मतदारसंघाचे आ. यशवंत माने यांनी पंचायत समितीच्या सभागृहात तातडीची बैठक आयोजित केली होती. यावेळी त्यांनी मोहोळ परिसरामध्ये सुरू असलेल्या नाजिक पिंपरी व कृषीविज्ञान केंद्र येथील कोविड केअर सेंटरमध्ये १०० बेड वाढवावेत, अशा सूचना दिल्या. याचबरोबर या दोन्ही सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याबरोबरच कर्मचारीसंख्या वाढवावी अशीही सूचना केली.
यावेळी सभापती रत्नमाला पोतदार, उपसभापती अशोक सरवदे, पं. स. सदस्य अजिंक्यराणा पाटील, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास तालुका वैद्यकीय अधिकारी अरुण पाथरुडकर, गटविकास अधिकारी गणेश मोरे, मुख्याधिकारी एन. के. पाटील, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक प्रल्हाद गायकवाड,सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने आदी उपस्थित होते.
----