करमाळ्यात तूर हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:18 AM2020-12-26T04:18:00+5:302020-12-26T04:18:00+5:30
करमाळा : तालुक्यात चालूवर्षी खरीप हंगामात पाऊस भरपूर झाल्याने शेतकऱ्यांना तुरीचे उत्पादन चांगले मिळाले आहे. शासनाने करमाळा येथे लवकरात ...
करमाळा : तालुक्यात चालूवर्षी खरीप हंगामात पाऊस भरपूर झाल्याने शेतकऱ्यांना तुरीचे उत्पादन चांगले मिळाले आहे. शासनाने करमाळा येथे लवकरात लवकर तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा घोरपडे यांनी केली आहे.
सध्या हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने व्यापारी शेतकऱ्यांची तूर ५ हजार ते ५,२०० इतक्या कमी दराने खरेदी होत आहे. क्विंटलमागे ८०० ते १००० रुपये नुकसान होत आहे. यासाठी प्रतिक्विंटल ६००० रुपये हमीभाव शासनाने जाहीर केलेला आहे. हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने शासकीय यंत्रणेला अपयश येत आहे. लवकरात लवकर तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा शिल्पा घोरपडे यांनी दिला आहे.