सांगोल्यातून दिल्लीसाठी आणखी दोन किसान रेल्वे सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:37 AM2020-12-12T04:37:41+5:302020-12-12T04:37:41+5:30

रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या सांगोला-मुझफ्फरपूर, बंगळुरू-सांगोला-आदर्शनगर (दिल्ली), सांगोला-सिकंदराबाद, सांगोला-शालिमार (कलकत्ता) अशा चार किसान रेल्वेच्या माध्यमातून डाळिंब, सिमला मिरचीची वाहतूक ...

Demand to start two more Kisan Railways from Sangola to Delhi | सांगोल्यातून दिल्लीसाठी आणखी दोन किसान रेल्वे सुरू करण्याची मागणी

सांगोल्यातून दिल्लीसाठी आणखी दोन किसान रेल्वे सुरू करण्याची मागणी

Next

रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या सांगोला-मुझफ्फरपूर, बंगळुरू-सांगोला-आदर्शनगर (दिल्ली), सांगोला-सिकंदराबाद, सांगोला-शालिमार (कलकत्ता) अशा चार किसान रेल्वेच्या माध्यमातून डाळिंब, सिमला मिरचीची वाहतूक केली जात आहे.

शेतमाल, भाज्या, फळे या घटकाच्या व्यापाराकरिता व्यापारी, शेतकऱ्यांना किसान रेल्वे उपयुक्त ठरली आहे. शेतकऱ्यांचा किसान रेल्वेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याने शेतकऱ्यांसह रेल्वेलाही याचा फायदा झाला आहे. शेतमाल व जीवनावश्यक वस्तूची जलद गतीने वाहतूक करण्यासाठी सांगोला स्थाकातून मंगळवार व गुरुवार या दोन दिवशी आदर्शनगरसाठी (दिल्ली) आणखी दोन किसान रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वेमंत्री पीयूष गोयल व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे केदार-सावंत यांनी केली आहे.

-------

अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने प्रायोगिक तत्त्वावर ऑपरेशन ग्रीन योजनेचा विस्तार करून फळे आणि भाजीपाला या कक्षेत आणण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार फळे व भाजीपाला रेल्वेतून वाहतूक करण्यासाठी ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यात द्राक्ष, खरबूज, कलिंगड व बोर या फळांनाही वाहतूक दरात ५० टक्के सवलत मिळावी.

- चेतनसिंह केदार-सावंत, तालुकाध्यक्ष, भाजप

Web Title: Demand to start two more Kisan Railways from Sangola to Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.