करमाळयातील स्मशानभूमीत पाणी व वीजेची सोय करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:40 AM2021-02-18T04:40:13+5:302021-02-18T04:40:13+5:30
करमाळा येथील अल्पसंख्यांक मुस्लिम बांधवांसाठी आनंदबाग कब्रस्तान येथे नगरपालिकेने बोअरवेल घेऊन, त्यावर हातपंप बसविला आहे. परंतु सध्या तो नादुरुस्त ...
करमाळा येथील अल्पसंख्यांक मुस्लिम बांधवांसाठी आनंदबाग कब्रस्तान येथे नगरपालिकेने बोअरवेल घेऊन, त्यावर हातपंप बसविला आहे. परंतु सध्या तो नादुरुस्त असल्यामुळे, बोअरवेलला पाणी असुनसुध्दा मयताच्या अंत्यविधी प्रसंगी पाणी उपलब्ध होत नाही. या बोअरवेलवरील नादुरुस्त हातपंप काढुन ईलेक्ट्रीक मोटार बसवावी.
या स्मशानपभूमीत रात्री मयतावर अंत्यसंस्कार अंधारातत करावे लागते, दफनभूमीमध्ये दिवाबत्तीची सोय नसल्यामुळे अंत्यविधी करताना साप, विंचू या विषारी प्राण्यांचा भीती असते. तसेच अंधारामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या रहेनुमा चॅरिटेबल सोशल वेल्फेअर संस्थेमार्फत दफनभुमीमधील काटेरी झुडपे काढणे, परिसर स्वच्छता, अंतर्गत रस्ते, वृक्ष लागवड इत्यादी कामे केली जात आहेत. निवेदन करमाळा नगरपालिकेला देण्यात आले आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष हाजी कलीम काझी, सचिव सूरज शेख, मार्गदर्शक इसाक पठाण, राष्ट्रवादी करमाळा शहर उपाध्यक्ष आझाद शेख, संस्थेचे उपाध्यक्ष ईमत्याज पठाण, मुस्तकिम पठाण, सहसचिव राजू सय्यद, जमील बागवान, शमो सय्यद उपस्थित होते.
फोटो : १७ करमाळा स्मशानभूमी
करमाळा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वीणा पवार यांना निवेदन देताना सोशल वेल्फेअर संस्थेचे पदाधिकारी.