भाजपच्या आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:15 AM2021-07-08T04:15:41+5:302021-07-08T04:15:41+5:30

करमाळा : भाजपच्या आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी भाजपाचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी निवेदनाद्वारे केली. हे निवेदन करमाळा ...

Demand for withdrawal of suspension of BJP MLAs | भाजपच्या आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी

भाजपच्या आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी

Next

करमाळा : भाजपच्या आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी भाजपाचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी निवेदनाद्वारे केली. हे निवेदन करमाळा तहसील कार्यालय येथे मंगळवारी निवडणूक नायब तहसीलदार जितेंद्र मोरे यांचेकडे देण्यात आले.

राज्यात सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारने स्वतःचे अपयश झाकण्यासाठी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले. ही लोकशाहीची गळचेपी असल्याचा आरोप चिवटे यांनी केला आहे.

यावेळी महाआघाडी सरकारच्या या दडपशाही कृत्याचा भाजपा कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध केला. यावेळी ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका उपाध्यक्ष रामा ढाणे, दादासाहेब देवकर, मच्छिंद्र हाके, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष बाळासाहेब होसिंग, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष धर्मराज नाळे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विजयकुमार नागवडे, तालुका प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे पाटील, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष हर्षद गाडे, शहराध्यक्ष ऋषिकेश फंड, रामदास गायकवाड, पुष्पक ढेरे, राजेंद्र गुंड, विजय शिंदे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो : ०६ करमाळा स्ट्राईक

भाजपच्या आमदारांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार जितेंद्र मोरे यांना देताना गणेश चिवटे आणि कार्यकर्ते.

Web Title: Demand for withdrawal of suspension of BJP MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.